Loksabha Election Prithviraj Chavan esakal
पश्चिम महाराष्ट्र

'वंचित'नंतर सांगली मतदारसंघावर काँग्रेसचा दावा; पृथ्वीराज चव्हाणांनी जाहीर केला उमेदवार, कोणाला मिळाली संधी?

सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा (Congress) आहे. याबद्दल शंक बाळगू नका.

सकाळ डिजिटल टीम

'वंचित बहुजन आघाडी निश्‍चितपणे इंडिया आघाडीचा घटक असेल, असा विश्‍वास चव्हाण यांनी व्यक्त केला; परंतु त्यांनी शिवसेनेसोबत स्वतंत्र चर्चा करून पुरेसे ठरणार नाही.'

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा (Congress) आहे. याबद्दल शंक बाळगू नका. येथून विशाल पाटील लढतील, यावर आता एकमत झालेले आहे. त्यांची तयारी भक्कम आहे. गेल्यावेळी वंचित आघाडीचा फटका बसला होता. यावेळी सांगलीचा मतदार सावध आहे, तो काँग्रेसच्या मागे ताकद उभी करेल, असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, ‘‘राज्यात पुढचा भूकंप विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचा असेल, अशी अपेक्षा आहे. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झालेले आहे. अशावेळी विधानसभा अध्यक्ष त्यांच्या पक्षाच्या हिताचा निर्णय करतील की कायद्याला धरून हे पाहावे लागेल. ते राजकीय निर्णय घेतील, असेच दिसते आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय काय करते, यावर या देशाची लोकशाही आणि संविधान टिकेल की नाही, याचा फैसला होईल.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव आणि त्यासाठी मतविभागणी टाळणे याला इंडिया आघाडीचे प्राधान्य आहे. भाजपला ३७ टक्के मते मिळाली आहेत. ती २०१४ ला ३१ टक्के होती. आता राम मंदिरचा मुद्दा ते वाजवत असले तरी टक्केवारीत फार वाढ होईल, असे वाटत नाही.

राम मंदिराचा विषय वादात होता. न्यायालयाने निर्णय दिला आणि खासगी ट्रस्ट मंदिर बांधत आहे. त्यात भाजप ढोल वाजवून घेईल, मात्र महागाई, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, बेरोजगारी हे कळीचे मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहतील. मोदींना हे नकोय, म्हणून ते भाजप उमेदवाराच्या विरोधात सात-आठ उमेदवार उभे करू पाहत आहेत. त्यांना रसद पुरवत आहेत.’’

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करायचा असेल, तर विरोधी मतांची विभागणी टाळली पाहिजे, यावर इंडिया आघाडीचे एकमत आहे. देशात किमान साडेचारशे जागांवर एकास एक लढत दिली जाईल. अन्य राज्यांत जागा वाढण्याच्या संधी संपल्याने भाजप महाराष्ट्रात धडपड करत आहे. आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी फोडली. अजूनही ते शांत नाहीत. त्यांच्यासोबत गेलेले फितूर आहेत, कातडी बचावासाठी ते गेले आहेत. जनता आणि कार्यकर्ते त्यांच्यासोबत नाहीत, हे या निवडणुकीत स्पष्ट होईल, असा टोला त्यांनी लगावला.

वंचित सोबत येईल

वंचित बहुजन आघाडी निश्‍चितपणे इंडिया आघाडीचा घटक असेल, असा विश्‍वास चव्हाण यांनी व्यक्त केला; परंतु त्यांनी शिवसेनेसोबत स्वतंत्र चर्चा करून पुरेसे ठरणार नाही, महाविकास आघाडीसोबत चर्चा झाली पाहिजे, असे मतही मांडले. भाजप मराठा आणि धनगर समाजाला फसवत आहे. देवेंद्र फडणवीस फक्त वेळ मारून नेण्यात पटाईत आहेत, असा टोला त्यांनी आरक्षण प्रश्‍नावर बोलताना लगावला.

काँग्रेस चुकांतून शिकेल

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील चुकांतून काँग्रेस शिकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. राजस्थानमध्ये दोन नेत्यांमधील भांडणे मिटवण्यास कमी पडलो, अन्यत्र नाहक आत्मविश्‍वास नडला, हेही त्यांनी कबूल केले. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील नेतृत्व युवकांच्या हाती जाणार का, या प्रश्‍नावर त्यांनी ‘फक्त नेतृत्व युवकांकडे जाऊन बदल होत नाहीत, चुका सुधारण्याला प्राधान्य द्यावे लागेल’, असे स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT