‘तुला एकाशी लग्न करायचे आहे, तू सुखी राहशील आणि दरमहा ५० हजार मिळतील,’ अशी बतावणी केली.
सांगली : महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा व पैशांचे आमिष दाखवत लग्नाळू (Marriage) व्यक्तींकडून मायाजाल पसरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambag Police) कारवाई केली. महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
वर्षा बजरंग जाधव (सुलतानगादे, ता. खानापूर), शंकर बाबूराव थोरात (वसंतगड, ता. कऱ्हाड) अशी संशयितांची नावे आहेत. दरम्यान, पीडिता कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील असून तिने फिर्याद दिली. तिचा दोन वेळा जबरदस्तीने विवाह लावण्यात आला. तिसऱ्या विवाहासाठी नेत असतानाही आरडाओरडा करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ता व नागरिकांच्या मदतीने चारचाकी थांबवण्यात आली. पोलिसांनी कारवाई केली. हा प्रकार १ एप्रिल ते २३ मे दरम्यान घडला. पोलिसांनी माहिती दिली की, पीडिता कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात राहते. पतीचे बारा वर्षांपूर्वी निधन झालेय. कुटुंबाचा भार तिच्यावर आहे. १५ एप्रिल रोजी तिची मैत्रिण भेटली. पीडितेने ‘जगणे कठीण झाले आहे, काहीतरी काम असेल, तर सांग’ असे मैत्रिणीला सांगितले.
मैत्रिणीने संशयित वर्षा हिचा नंबर दिला. नंतर संशयित वर्षा व पीडितेचा संपर्क झाला. ५० ते ६० हजारांची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. दोघींची कऱ्हाड येथे भेट झाली. पीडितेच्या गरिबीचा गैरफायदा घेत संशयिताने फूस लावली. ‘तुला एकाशी लग्न करायचे आहे, तू सुखी राहशील आणि दरमहा ५० हजार मिळतील,’ अशी बतावणी केली. मात्र पीडितेने नकार दिला असता तिला जबरदस्तीने लग्नास भाग पाडले.
एक मे रोजी ६५ वर्षीय वृद्धासमवेत कऱ्हाडला विवाह लावून दिला. नंतर पीडिता वृद्धासमवेत पनवेल येथे राहू लागली. वृद्धास ती अन्य धर्मिय असल्याचे समजल्यानंतर नांदवण्यास नकार दिला आणि संशयित जाधव हिच्या घरी आणून सोडले. वृद्धाने पैशांची मागणी करण्यास सुरवात केली. दरम्यान, त्याच कालावधीत सांगली जिल्ह्यातील एका गावातील व्यक्तीचे लग्न जुळत नसल्याची माहिती पुढे आली. त्यास हेरून ९ मे रोजी जबरदस्तीने विवाह करून देण्यात आला.
त्यानंतर १५ मे रोजी पीडितास पुन्हा कऱ्हाडमध्ये आणून सोडण्यात आले. जाधवने पीडितेचे सोने व अन्य ऐवज काढून घेत बसमध्ये बसवले. नंतर पीडितेस धमकवण्यास सुरवात केली. वानलेसवाडी येथे येण्यास सांगितले. पीडिता काल सायंकाळी आली. प्रशांत सदामते व तिची भेट झाली. संशयितही चारचाकी (एमएच १४ एपी ९८२८) घेऊन आले. संशयित जाधव व तिचा भाऊ शंकर थोरात गाडीत होते.
पीडितेला धमकावत तिसऱ्या लग्नासाठी जबरदरस्ती केली. अक्षतेनंतर एक लाख रुपये खात्यावर जमा करू, अशी बतावणी केली. पीडितेने आरडाओरडा केला. ते पाहून नागरिकांनी गाडी थांबली. पोलिसांनी संशयितांना अटक केली. पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक पल्लवी यादव तपास करत आहेत.
लग्नाळूंना हेरून पैसे उकळत लग्न लावून देणाऱ्यांची साखळी असण्याची शक्यता आहे. पाळेमुळे खणून काढली जातील, असे निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले. फसवणूक झालेल्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.