Vita Municipal Newsletter: Emphasis on beautification of the city with cleanliness 
पश्चिम महाराष्ट्र

विटा नगरपालिका वार्तापत्र : स्वच्छतेसह शहर सौंदर्यकरणावर भर

दिलीप कोळी

विटा (जि. सांगली) : पालिका विकासकामाबरोबर विटा शहर स्वच्छ ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. स्वच्छतेसह शहरातील उपनगरे, कॉलनी, भाजी मंडई व मुख्य रस्त्यालगत विविध प्रकारचे कारंजे, पक्षी, प्राणी, शेतकरी, चरखा, फायबरच्या मूर्ती उभारून पालिकेने शहराचे सौंदर्यकरण वाढविले आहे. याचबरोबर बागबगीच्यांचीही कामे सुरू आहेत. काही विकासकामे प्रगतीपथावर तर काही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग तीन वर्षे स्वच्छतेत भारतात अव्वल ठरत असलेल्या पालिकेने 2020-21 मध्ये या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यादृष्टीने शहर स्वच्छतेकडे व शहराचे सौंदर्यकरण करण्यावर भर दिला जात आहे. आठवड्यातून एका शुक्रवारी स्वच्छतेचे महाअभियान राबविले जाते. पालिकेचे सफाई कामगार शहरातील रस्ते, ओढे-नाल्यांची सतत सफाई करत आहेत. ओढ्यांच्या ठिकाणीही झाडे लावून सुशोभीकरण केले आहे. शहरातील गांधी चौकातील दगडी पाण्याच्या टाकीवर सिंहाची प्रतिकृती, क-हाड रस्त्यावरील चिंचबंदर कॉर्नरवर शेतकऱ्याची प्रतिकृती उभारली आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ, विवेकानंदनगरमधील एकता कॉलनी, हजारे मळा, नेवरी नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे कारंजे बसविण्यात आले आहेत. शाहूनगरमधील बगीच्या येथे कोंबडा प्रतिकृती, सेल्फी पॉईंट व टाकाऊपासून टिकाऊ संकल्पनेतून गाडी बनविण्यात आली आहे. नवीन भाजी मंडई येथे शेतकऱ्याच्या हातावर पृथ्वी साकारली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरात भगवान बुद्धांचा हात व अशोकचक्राची प्रतिमा व लिंगायत समाज दफनभूमीनजीक मोराची प्रतिमा उभारल्या आहेत. यामुळे शहरातील सौंदर्य वाढले आहे. वसुंधरा अभियानांतर्गत संक्रीत, देशी विविध झाडे लावली जात आहेत. स्वच्छता व सौंदर्याबरोबरच शहरातील विकासकामे सुरू आहेत. विट्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांवरून शहरातील भुयारी गटरचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

रस्ता कॉंक्रीटीकरण करायचा का डांबरीकरण यावरून सत्ताधारी व विरोधकांत आरोपप्रत्यारोप झाले होते. त्या भुयारी गटर योजनेच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात व सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरू असल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. एकंदरीत शहरातील स्वच्छता, वाढते सौंदर्य व विकासकामांमुळे बदलते विटा शहर अशी शहराची ओळख होऊ लागली आहे. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT