Untitled-777.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

पंढरपूर : थंडीमुळे विठूरायाच्या अंगावर शाल आणि रजई 

अभय जोशी

पंढरपूर : “यथा देहे तथा देवे" या उक्ती प्रमाणे सावळ्या विठूरायाच्या बाबतीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रथा आहेत. विविध ऋतुमानात आपण आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेतो. त्याप्रमाणेच विठूरायाची देखील काळजी घेतली जाते. सध्या थंडीचा मोसम सुरु झाला असल्याने राजस सुकुमाराला थंडी वाजू नये म्हणून कानपट्टी बांधून अंगावरुन शाल आणि रजई घातली जात आहे.

कानपट्टी म्हणून सुमारे दोन ते अडीच मीटर लांबीचे करवती काठी उपरणे घडी घालून देवाच्या दोन्ही कानावरुन घट्ट बांधले जाते. शाल आणि रजई ही घातली जाते. पहाटे नित्यपूजा झाल्यावर देखीत पहाटेच्या वाऱ्याचा देवाला वास होऊ नये म्हणून काही वेळ पुन्हा कानपट्टी बांधली जाते.

श्री विठूरायाच्या संदर्भातील विविध प्रथांच्या संदर्भात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनिल तथा विठ्ठल जोशी आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सकाळला माहिती दिली. ते म्हणाले, उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सुमारे  80, ते 90 दिवस दररोज देवाला चंदन उटी पूजा केली जाते. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या या पूजेसाठी दररोज सुमारे चारशे ग्रॅम चंदन उगाळून संपूर्ण अंगावर लावले जाते.

आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या काळात जास्तीतजास्त
भाविकांना दर्शन व्हावे यासाठी देवाचा पलंग काढला जातो आणि मंदिर २४ तास उघडे ठेवते जाते. यात्राकाळात भाविकांना दर्शन
देण्यासाठी देव अखंड उभा असतो. भक्तांना दर्शन देण्यासाठी सतत उभारुन दमलेल्या देवाचा थकवा दूर व्हावा यासाठी देवाच्या अंगाला सुगंधित तेलाने मालिश केले जाते.

लवंग, वेलदोडे, दालचिनी, गवती चहा, खारीक, बदाम, तुळस आदी घालून बनवलेला काढा प्रक्षाळपूजे दिवशी दाखवण्याची प्रथा आहे. दमलेल्या देवाला पीठी साखर लावून गरम पाण्याने स्नान घातले जाते. विठुरायाच्या नैवेद्यात ही ऋतुमानाप्रमाणे बदल करण्याची प्रथा आहे. देवाच्या नैवेद्यात थंडीत बासुंदी, उन्हाळ्यात आमरस तर अन्य काळात श्रीखंडाचा समावेश केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाही प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT