सांगली : जगातील कठोर हुकूमशहा हिटलरने देखील उठून उभे राहत सुभाषचंद्र बोस यांचे एका राष्ट्राचे सर्वोच्च नेते म्हणून स्वागत केले. तेंव्हापासून सुभाषबाबूंना नेताजी असे ओळखले गेले. जर्मनीतून परतताना हिटलरला त्याच्या "माईन काम्फ' या आत्मचरित्रातील हिंदी लोकांविषयीचा प्रचाराचा उल्लेख असलेला उतारा गाळण्याचा सल्ला देण्याचे धाडसही सुभाषबाबूंनीच दाखवले होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत विवेक घळसासी यांनी येथे केले.
हे पण वाचा - महापूर झेलूनही राज्यात कोल्हापूरच भारी
राष्ट्र सेविका समिती संचलित श्री महालक्ष्मी प्रतिष्ठानतर्फे सांगली अर्बन बॅंकेत आयोजित व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी "नेताजी आजही आदर्श' विषयावर ते बोलत होते. अभिनय कामाजी, सुलोचना बापट, कमलताई जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. घळसासी म्हणाले,""सुभाषबाबूंवर 110 पुस्तके प्रकाशित झालीत. ती वाचताना वेगळा दृष्टीकोन आवश्यक आहे. त्यांचे एकंदरीत जीवन प्रेरणादायी होते. कॉंग्रेस अधिवेशनात तरूणांचा घोळका सतत त्यांच्यासोबत असे. त्यांचे व्यक्तीमत्व प्रेरणादायीच होते. सावरकरांनी त्यांना देशाबाहेर राहून स्वराज्यासाठी सक्रीय राहण्याचा सल्ला दिला. नागपूरला ते डॉ. हेडगेवारांना भेटून निघाले. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आंदोलन नेण्याचा निर्णय घेतला. ब्रिटिशांच्या नजरकैदेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्राहून सुटका कशी करून घेतली याचे विचार सुभाषबाबूंच्या मनात होते. 16 जानेवारी 1941 ला त्यांनी पलायन केले. 26 जानेवारीपर्यंत त्याची घरातील लोकांनाही खबर नव्हती. पेशावरमार्गे ते रशिया, इटलीतून जर्मनीत पोहोचले. तोपर्यंत सर्वत्र त्यांचे नेटवर्क निर्माण झाले. हिटलरने त्यांना राजदूताप्रमाणे वागणूक द्या असे सांगितले होते.''
हे पण वाचा - चोरी केली कोल्हापुरात आणि अटक..
ते म्हणाले,""हिटलरला भेटून पश्चिमेतून पुर्वेकडे जपानला जाण्यासाठी पाणबुडीतून सलग तीन महिने प्रवास केला. पाणबुडीतील दोन बाय पाच फुटाच्या जागेत समुद्रात खोलवरही त्यांना पुस्तक लिहिण्याची प्रेरणा झाली. जपानमध्ये गेल्यानंतर मोठी मदत मिळाली. काही लाखापर्यंत त्यांनी सैन्य जमवले. सैन्य पोटावर चालते हे खरे नसून ते ध्येयावर चालते हे सर्वप्रथम सुभाषबाबूंनी सिद्ध केले. 21 ऑक्टोबर 1943 ला त्यांनी स्वतंत्र भारताचे अस्थायी सरकार स्थापन केले. त्यांना जपानसह 9 राष्ट्रांनी अधिकृत मान्यता दिली. हिटलरने एकावेळी एका देशाशी लढावे, असा सल्ला दिला. परंतू ऐकले नाही. हिटलरने रशियावर हल्ला केला. त्यात पराभव झाला. जर्मनीनंतर जपानला टार्गेट करून बॉम्बहल्ले झाले. तेव्हा जपानहून विमानाने परतताना नेताजीचा अपघाती मृत्यू झाला असे काही पुरावे सांगतात. परंतू आजही भारतीयांच्या त्यांचा अपघातात मृत्यू झाला की ते दुसरीकडे गेले याचा संभ्रम आणि मृत्यूविषयी गुढ कायम आहे.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.