''गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणाविरोधात, ‘लव्ह जिहाद’, धर्मांतरविरोधी कायदा याबाबत आवाज उठवण्यासाठी मी पक्षाकडे हिंदुत्ववादी उमेदवार म्हणून मला संधी द्यावी.''
सांगली : ‘‘राज्यातील गड-किल्ले अतिक्रमणमुक्त करायचे असतील तर हिंदुत्ववादी सरकारच आले पाहिजे. लोकसभेला हिरवा गुलाल उधळला गेला. मात्र आता विधानसभेला भगवा गुलालच उधळणार, असा निर्धार करा,’’ असे प्रतिपादन हिंदू एकता आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे (Nitin Shinde) यांनी केले.
प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणावर विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार नितीन शिंदे यांचा हिंदुत्ववादी संघटना (Hindu Association) व हिंदू एकता आंदोलन, सांगली जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कच्छी भवन येथे आयोजित या सोहळ्यात गायत्री परिवाराचे प्रमुख नरेंद्र जानी, भाजपचे नेते दीपक शिंदे, उद्योजक मनोहर सारडा, व्यापारी संघटनेचे प्रदीप बोथरा, श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
नितीन शिंदे म्हणाले, ‘‘प्रतापगडावरील अफजलखान दर्ग्याभोवतीचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यास सरकारला भाग पाडले. त्याच पद्धतीने विशाळगडावरील इस्लामिक अतिक्रमण व बेकायदेशीर दर्गासुद्धा उद्ध्वस्त करायला लावणार आहे.’’
यावेळी दीपक शिंदे म्हणाले, ‘‘नितीन शिंदे समर्पित भावनेने काम करतात, हे प्रतापगडावरील, विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी आंदोलनात पाहिले आहे.’’ ॲड. स्वाती शिंदे म्हणाल्या, ‘‘राज्यातील सध्याचे वातावरण पाहता विधानसभेमध्ये हिंदूंचे प्रश्न मांडण्यासाठी हिंदुत्ववादी आमदाराची गरज आहे.’’
यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नरेंद्र जानी, मनोहर सारडा, मनोज साळुंखे, शिवाजी पाटील, अरुण वाघमोडे, शैलेश पवार, अविनाश मोहिते, श्रीकांत शिंदे, महेंद्र चंडाळे, राजू रसाळ, विष्णुपंत पाटील, यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.
कार्यक्रमात वक्त्यांनी विधिमंडळात हिंदुत्वाचे प्रश्न मांडणारा उमेदवार हवा, असे मत मांडले. यावर नितीन शिंदे म्हणाले, ‘‘गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणाविरोधात, ‘लव्ह जिहाद’, धर्मांतरविरोधी कायदा याबाबत आवाज उठवण्यासाठी मी पक्षाकडे हिंदुत्ववादी उमेदवार म्हणून मला संधी द्यावी, अशी मागणी करतो.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.