Chandoli Dam Water sakal
पश्चिम महाराष्ट्र

Chandoli Dam Water : चांदोली धरणसाठ्यात अर्धा टीएमसीने वाढ

सकाळ वृत्तसेवा

शिराळा - चांदोली धरण परिसरामध्ये पावसाची संततधार कायम असली तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर चांदोलीपेक्षा जास्त असल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.

आज सोमवारी सकाळी सातपर्यंत ४ हजार ५८९ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. १ जूनपासून ३० जूनअखेर ४५७ मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत (रविवारी सकाळी ते सोमवारी सकाळी ८ वा. पर्यंत) ४८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

१ जून रोजी धरणात ११.३ टीएमसी पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी ३२.०५ होती. ३० जून रोजी धरणात ११.५१ टीएमसी पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी ३३.४४ आहे. म्हणजेच एका महिन्यात ०.४८ म्हणजे सुमारे अर्धा टीएमसीने पाण्याची वाढ झाली आहे.

गतवर्षी ३० जून रोजी धरणात १०.७३ टीएमसी पाणीसाठा होता. हाच पाणीसाठा यंदा ११.५१ टीएमसी आहे. म्हणजे सुमारे ०.७८ टीएमसीने जास्त आहे. गतवर्षी ३० जूनअखेर १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

यावर्षी ४५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३२४ मिलिमीटर जास्त पाऊस या वर्षी झाला आहे. चांदोली धरणाची क्षमता ३४.४० टीएमसी आहे. दरवर्षी हे धरण १०० टक्के भरते.

चांदोलीतील पाऊस व धरण पातळी

रविवारी सकाळी आठ ते सोमवारी सकाळी ८ पर्यंत २४ तासांत चांदोली परिसरात ४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण पाऊस ५०५ मिलिमीटर असा झाला आहे. धरणाच्या पाण्याची पातळी ५९८.६५ मीटर, तर पाणीसाठा ३३५.३५० द.ल.घ.मी. आहे. धरणात ११.८४ टी.एम.सी. म्हणजे ३४.४२ टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या लो लेव्हल गेटमधून पाण्याचा विसर्ग ६७५ क्युसेकने सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT