नवेखेड : सलग दुसऱ्यावर्षी लॉकडाऊनचा (lockdown) फटका शेती क्षेत्राला (farming) बसला आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील (sangli district) आष्टा (ता. वाळवा) येथील शेतकरी (aashta) अनिल शिंदे यांनी कलिंगड पिकाचे (water mellon cultivation) एकरी ३२ टन इतके उत्पन्न घेतले आहे. पेठ सांगली रस्त्यावर सव्वालाखी अष्टे गावचे शिवार लागते. रस्त्यालगतच शिंदे यांची संपूर्ण शेत जमीन व राहते घर आहे.
अवघ्या ६५ ते ७० दिवसांत चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून याची ओळख आहे. फक्त विक्री आणि दराचे गणित जुळायला हवं. सलग दोन वर्षे शिंदे यांनी या पिकात आपला हातखंड ठेवला आहे. शिंदे म्हणाले, एप्रिल महिन्यात येणारा रमजान सण येतो. त्या दरम्यान माल काढणी योग्य होईल. या दृष्टीने त्याची लागवड केली जाते. साधारणपणे १० ते १२ फेब्रुवारीच्या दरम्यान शुगर क्वीन वाणाच्या रोपांची लागवड साडेचार फूट सरीमध्ये जिगजयग पद्धतीने केली जाते. रोपे एकदा जगून निघाली की संजीवके कीटकनाशके (fertilizer) यांचा योग्य त्या शिफारशीप्रमाणे वापर केला जातो. आठ दिवसाला पाण्यासाठी मात्र दक्ष राहावे लागते. अगदी ६२ व्या दिवशी माल काढणी योग्य होतो.
यावर्षी केळीत कलिंगडाचे आंतरपीक
गतवर्षीचा अनुभव पदरी असल्याने यंदाही कलिंगड करायची असा निर्धार शिंदे यांनी केला. परंतु क्षेत्र रिकामे नव्हते. जे होते त्यात केळी लागवडीचे नियोजन होते. शिंदे यांनी धाडस करून केळीत कलिंगडाचे आंतरपीक घेण्याचे नियोजन केले. केळीला मल्चिंगचा वापर करण्यात आला. सुरूवातीला मल्चिंग अंथरून झाल्यावर केळीच्या लावणीचे मार्किंग करून घेण्यात आले. नंतर एक आड एक सरीत का बगलेवर कलिंगडाच्या रोपांची लावण केली. वास्तविक केळीत वेलवर्गीय पिके घेऊ नयेत असे संकेत आहेत. कारण केळी पिकावर इतर रोगांचा पटकन प्रादुर्भाव होतो.
वेलवर्गीय पिके या प्रादुर्भावास कारणीभूत ठरतात. शिंदे यांनी मात्र आंतरपीक म्हणून कलिंगडाची ७,५०० रोपे लावली. एक आड एक सरीवर बगली लावल्याने प्रत्यक्षात एक एकर क्षेत्र लागले. ६२ व्या दिवशी ती काढली. त्यांना एका एकरात तब्बल बत्तीस टनाचे उत्पन्न मिळाले. रमजानच्या दरम्यान महिनाभर उपवास असल्याने फळांचे भाव चढे राहतात. या अनुभवातून शिंदे यांनी याच दरम्यान फळांची काढणी व विक्री कशी होईल याचे नियोजन केले. त्यांना यश आले तर एक किलोला नऊ ते दहा रुपये दर मिळाला.
एकरी खर्च
लावण, काढणी, व्यवस्थापन खर्च एकूण ९६००० रुपये इतका आला.
मागील वर्षी प्रतिकिलो ७००० रुपये
चालू वर्षी प्रतिकिलो ९००० रुपये
या कलिंगड खा
अनिल शिंदे हे शेतकरी असले तर शिक्षक असल्याने गाव व परिसरात त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कलिंगड काढणी योग्य झाल्यावर त्यांनी गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर 'या कलिंगड खा' अश्या आशयाची पोस्ट टाकली होती. अनेकांनी त्याचा लाभ घेतला. व्यापारीदृष्टी कोनातून ते शेती करत असले तरी शेतकरी धर्म ते विसरले नाहीत.
"कोणत्या हंगामात फळांना मागणी अधिक लागते याची माहिती घेऊन शेतकऱ्यांनी पीक लागवड करावी. हमखास यशस्वी होतो."
- अनिल शिंदे, शेतकरी आष्टा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.