सोलापूर ः नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शविण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कायद्याच्या समर्थनार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
हेही वाचा.... देशभरात हिंसाचाराच्या घटना, वाचा कुठे काय घडले
या आंदोलनात खासदार डॉ जयसिद्धेशवर शिवाचार्य महास्वामी, रोहिणी तडवळकर,मोहन डांगरे, अजय आरगडे,सुरज पावसे, राजकुमार पाटील,सृष्टी डांगरे आदींची उपस्थिती होती. अभाविपचे महानगर मंत्री सुरज पावसे, सृष्टी डांगरे यांनी नागरीकत्व कायद्याचे समर्थन करताना प्रत्येक भारतीयाने या कायद्याचे स्वागत करावे, असे आवाहन केले.
हे आवर्जून वाचा... नागरीकत्व कायद्याबाबत काय म्हणाल्या ममता बॅनर्जी
सर्वांना समान न्याय मिळाला
भारत सरकारने मंजूर केलेल्या नागरीकत्व कायद्याच्या समर्थनार्थ हे निवेदन देत आहोत. या कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेशमध्ये अल्पसंख्याक असलेले शीख, जैन, बौद्ध, पारसी, इसाई व हिंदू हे धार्मिक अत्याचारामुळे भारतात येऊन राहतात. गेल्या 70 वर्षांत या लोकांना भारतात काहीच सुविधा मिळालेल्या नाहीत. कोणत्याही सवलतीही मिळाल्या नाहीत. त्यामुळे या नागरिकांना छावण्यांमध्ये राहण्याशिवाय पर्याय नाही. वारंवार मागणी करूनही त्यांना नागरीकत्व मिळालेले नाही. विद्यमान सरकारने कायदा करून सर्वांना समान न्याय दिला आहे, त्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वागत करत आहे, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
हेही वाचा... नागरीकत्व कायद्यावरून मुंबईत नागरिकांचा एल्गार
समाजकंटकांवर करावी कारवाई
राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. या कायद्याची संपूर्ण देशात त्वरीत अंमलबजावणी करावी. या कायद्याच्या आडून काही असामाजिक तत्व देशात हिंसा तथा अराजकता पसरविण्याचे काम करत आहे. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी समाजात चुकीची माहिती पसरवून समाजात तेढ निर्माण करीत आहे. अशा सर्व समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परीषद आपल्याकडे करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.