Bijapur-Guhagar Highway Palus-Sandgewadi Road esakal
पश्चिम महाराष्ट्र

विजापूर-गुहागर महामार्गालगतची 'ही' विहीर बनलीये धोकादायक; अपघात होऊन सरळ दुचाकी गाड्या जाताहेत विहिरीत

विजापूर-गुहागर महामार्गावर पलूस (सांडगेवाडी) येथे लाईफ केअर हॉस्पिटलसमोर महामार्गालगतच एक विहीर (Well) आहे.

सकाळ डिजिटल टीम

महामार्गालगतच असलेल्या विहिरीमुळे अपघात होत आहेत. दुचाकी सरळ विहिरीत जात आहेत.

पलूस : विजापूर-गुहागर महामार्गावर (Bijapur-Guhagar Highway) पलूस येथे महामार्गाला लागूनच असलेली विहीर धोकादायक बनली आहे. महामार्गावर दिवसेंदिवस वाढत चाललेली अतिक्रमणे अपघातास आमंत्रण देत आहेत. वाढत्या अतिक्रमणांकडे केंद्रीय महामार्ग समितीचे (Central Highway Committee) पूर्णपणे दुर्लक्ष आहे.

विजापूर-गुहागर महामार्गावर पलूस (सांडगेवाडी) येथे लाईफ केअर हॉस्पिटलसमोर महामार्गालगतच एक विहीर (Well) आहे. महामार्गाचे काम सुरू असताना बुजवून घेणे आवश्यक होते. मात्र, विहीर आहे तशीच ठेवण्यात आली. अगदी महामार्गालगतच असलेल्या विहिरीमुळे अपघात होत आहेत. दुचाकी सरळ विहिरीत जात आहेत.

त्याठिकाणी विहीर आहे, हे वाहनचालकांच्या सहजासहजी लक्षात येत नाही. केंद्रीय महामार्ग समितीने तातडीने विहीर बुजवून घेण्याची मागणी होत आहे. महामार्गावर विविध स्टॉल, वाहनांचे पार्किंग, दुकानांचे फलक, बांधकाम साहित्य अशी अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर आहेत. पदपथ नावालाच आहेत. काही ठिकाणी तर पदपथाच्याही बाहेर अतिक्रमणे आहेत. महामार्गावरील अतिक्रमणांवर केंद्रीय महामार्ग समितीसह पलूस नगरपरिषदेचेही अजिबात नियंत्रण नाही.

महामार्गावर दिवसभर लहानमोठी वाहने दिवसभर पार्किंग केलेली असतात. त्याकडे दुर्लक्ष करून अन्य वाहनचालकांवर कारवाई केली जाते. चक्क महामार्गावरच दिवसभर क्रेन पार्किंग करतात. जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याठिकाणी मोठा अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल विचारला जात आहे. पलूस हे तालुक्याचे ठिकाण आहे. औद्योगिक वसाहत, शाळा-महाविद्यालये, बाजारपेठ यामुळे आधीच मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.

विजापूर महामार्गावरून पलूस येथून मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड, इस्लामपूर, सांगली, तासगाव, कवठेमहांकाळ, सोलापूर, विटा व अन्य मार्गाकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड आहे. मात्र, महामार्गावरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पदपथावरील अतिक्रमणांमुळे पादचारी नागरिक, महिला, विद्यार्थी, लहान मुलांना महामार्गावरून जीव मुठीत धरून पायी जावे लागते.

महामार्ग, पदपथ नावालाच!

पलूस शहरातून महामार्ग गेल्यामुळे वाहतुकीची कोंडी थांबेल, पदपथामुळे पादचारी, महिला, विद्यार्थी, लहान मुलांना सुरक्षितपणे पायी ये-जा करता येईल. अपघात कमी होतील, अशी अपेक्षा होती. महामार्ग झाला, मात्र अतिक्रमणे, पार्किंग महामार्गावर, पदपथावर अशी स्थिती आहे. त्यामुळे महामार्ग व पदपथ नावालाच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT