western maharashtra in jaysingpur start silken center in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये जयसिंगपूरात होणार आता रेशीम कोश खरेदी

अजित कुलकर्णी

सांगली : बारामतीनंतर आता जयसिंगपूरमध्ये पश्‍चिम महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल असे रेशीम कोश खरेदी-विक्रीचे केंद्र सुरु होत आहे. नव्या वर्षात सुरू होणाऱ्या या केंद्रामुळे सांगली-कोल्हापूरसह कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचीही सोय होणार आहे. यानिमित्ताने रेशीम लागवडीलाही चालना मिळेल, अशी आशा आहे.    

उत्पादन खर्च, पाणी आणि मनुष्यबळ कमी. आणि हमीभावाची निश्‍चितीसह उत्पादनाची हमखास खात्री असल्याने तुती लागवडीत वाढ होत आहे. शेतकऱ्यांचा वेळ, श्रम व पैसा वाचवणारा उद्योग म्हणून तुती लागवड व रेशीम उद्योगाकडे कल वाढला आहे. रेशीम उत्पादनात महाराष्ट्राचा तसा अल्प वाटा आहे.

राज्यात द्राक्ष किंवा डाळिंबाचे क्षेत्र वाढत असताना तुती लागवड मात्र वाढली नाही. या फळपिकांच्या तुलनेत रोग व कीटकांचा प्रादुर्भाव अत्यंत कमी असल्याने तुती लागवड कमी खर्चिक आहे. रेशीम अळ्यांची अंडीपुंज सवलतीच्या दरात मिळतात. शासन अनुदानास प्राप्त आहेत. दोन आठवड्यात कोश उत्पादन सुरु होते. मनरेगा अंतर्गत रेशीम उद्योगाला अनुसूचित जाती-जमाती, अल्पभूधारक शेतकऱ्यांना सव्वातीन लाखापर्यंत अनुदान साहित्य स्वरुपात व टप्प्या-टप्प्याने मिळते. या सर्व प्रयत्नाचे फळ म्हणून आता तुती लागवड वाढत आहे.

जिल्ह्यात सुमारे १५० एकरांवर मनरेगातून तुती लागवड झाली आहे. जत तालुक्‍यात हे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यातील शेतकरी कर्नाटकातील अथणी, चिकोडी, बेळगाव, रामनगर येथील बाजाराशिवाय कोश विक्रीसाठी जायचे. आता जयसिंगपूरला कृषी उत्पन्न बाजार समितीशी करार झाला असून सुमारे दोन हजार चौरस फुट जागेत डिसेंबरअखेरीपर्यंत ते केंद्र सुरु होईल. आठवड्यातील मंगळवार, गुरुवार व शनिवारी त्याचे कामकाज चालेल.

कवठेएकंदला रेशीम धागा 

कवठेएकंद (ता. तासगाव) येथेही खासगी मालकीचे पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिले रेशीम धागा निर्मिती केंद्र शासनाच्या अनुदानातून साकारत आहे. तेथे स्वयंचलित यंत्राव्दारे रेशीम धागा तयार होईल. त्यासाठीची कोश खरेदी बारामतीतून होते. या केंद्राला लागणारा रोजचा दीड टन कोश आता जयसिंगपूर केंद्रातून उपलब्ध होऊ शकतो. धागा केंद्रासाठी सुमारे २५ जणांचे प्रशिक्षणही सुरू आहे.

"हा फायद्याचा कृषीपूरक उद्योग असल्याने शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. विविध योजनाही पूरक ठरत आहेत. जयसिंगपूर आणि कवठेएंकद केंद्रामुळे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातून रेशीम उत्पादन नक्की वाढेल."


- संजय शिंदे, प्रभारी जिल्हा रेशीम अधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT