पश्चिम महाराष्ट्र

असं करतात पोस्टमार्टेम

सुस्मिता वडतिले

सोलापूर : कोणत्याही अनैसर्गिक, संशयित, आत्महत्या किंवा पोलिसांनी सुचना केलेल्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम (शवविच्छेदन) केले जाते. पण पोस्टमार्टेम नको असा अनेकांचा आग्रह असतो. पोस्पमार्टमबाबत अनेकांच्या मनात भिती आणि गैरसमज असतात. पोस्टमार्टेमसाठी वेळही जातो, मृतदेहातील काही अवयव काडून घेतले जातात, दारु पिऊनच पोस्टमार्टेम केले जाते... अशी एकना अनेक चर्चा आपण अनेकदा एकत असतो. याच्यातील वास्तव काय... का केले जाते पोस्टमार्टेम... यासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक साधने काय असतात... याबाबत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्चार रुग्णालयातील प्रभारी अधिष्ठता एस. एस. सावस्कर यांच्याशी झालेली ही बातचित...

काँग्रेस हा महाराष्ट्राचा शत्रू नाही : संजय राऊत

यामुळे करतात पोस्टमार्टेम...
नैसर्गिक आणि अनैसर्गिक ही मृत्यूची दोन कारणे आहेत. त्यापैकी नैसर्गिक मृत्यू हा वय झाल्यानंतर यतो. मात्र अनैसर्गिक मृत्यू हा संशयाच्या भोवऱ्यात असतो. त्याचे निदान व्हावे म्हणून न्यायवैद्यकीयशास्त्र विभागत पोस्टमार्टम केले जाते. एखाद्याने आत्महत्या केली असेल किंवा एखाद्याची हत्या केली असेल, कोणी मारहाण केली असेल मात्र त्याचा पुरावा ठेवला जात नाही, अशावेळी मृत्यूचे कारण समजावे म्हणून तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मदतीने पोस्टमार्टम केले जाते. एखादा संशयित मृतदेह असेल तर तज्ज्ञ डॉक्‍टरांना पोलिस पोस्टमार्टम करण्याची शिफारस करतात. त्यामुळे मृत्यस कारणीभूत असलेल्या घटपापर्यंत पोचण्यासाठी मदत होते.

पोस्टमार्टमचे हे असते उद्दीष्ठ
पोस्टमार्टम केल्यानंतर मृत्यूचे कारण समजते. त्यासाठी त्याची पध्दत निश्‍चित केली जाते. त्यावरून मृत्यू कधी झाला, त्याची वेळ काय किती असेल याचा अंदाज लावला जातो. एखाद्या मृत्यूला कारणीभूत असलेली वस्तू ओळखण्यासाठी म्हणजे कोणत्या शस्त्राने हत्या केली. याबरोबर गुन्हेगार ओळखण्यासाठी व त्याचे पुरावे गोळा करण्यासाठी पोस्टमार्टम अहवालाचा उपयोग होतो. याबरोबर मृतदेहावरील जखमांची माहिती एकत्रित करणे व कशा जखम झाल्या हे सांगण्यासाठी पोस्टमार्टम उपयुक्त ठरते.

भाजपकडे आकडा नसेल तर त्यांनी बाजूला व्हावं : नवाब मलिक

या विद्यार्थ्यांनाही होता उपयोग
कोणत्याही मृत्यूचे कारण समजावे म्हणून पोस्टमार्ट केले जाते. याबरोबर पोस्टमार्टचा उपयोग न्यायवैद्यकीयशास्त्र विभागात एमबीबीएस, बीपीएमटी कोर्सच्या विद्यार्थ्यांना शवविच्छेदनाबाबत प्रशिक्षण दिले जाते. गुंतागुंतीच्या प्रकरणात शवविच्छेदनावेळी काय काळजी घ्यायला हवी, याची माहिती प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांना व्हावी या म्हणून पोलिस व वकीलांसमवेत चर्चासत्र घेतली जातात.

दारु पिऊन पोस्टमार्ट करतात का?
पोस्टमार्ट करायचे म्हटलं की अनेकजण म्हणतात दारु पिऊन पोस्टमार्ट केले जाते. कोण म्हणते त्याच्या डोक्‍यात मोठ दगड घालून डोक फोडल जातं. मग कशाला पोस्टमार्टम करायचे? पण हे सर्व गैरसमज आहेत. पोस्टमार्टम विभागात असं काहीही नसतं. तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मागर्दशनाखालीच हे पोस्टमार्ट केले जाते. दारु पिऊन पोस्टमार्टम करतात ही खोटी माहिती आहे.


अवयव काडून घेतात का?
मृत्यू झाल्यानंतर पोस्टमार्टमवेळी मृतदेहातील काही अवयव काडून घेतले जातात. अशी चर्चा असते. त्यामुळे काहीजण पोस्टमार्ट करण्यासाठी विरोध करतात. मात्र पोस्टमार्ट करताना डॉक्‍टर कधीही कोणताही अवयव काडून घेत नाहीत. मृत्यूचे कारण समजावे म्हणून पोस्टमार्टम करताना त्याच्या शरिरातील अवयवात काही बदल झालेत का? याची पाहणी करुन मृत्यूचे कारण मिळावे म्हणून त्याची तपासणी केली जाते.

पोस्टमार्टमसाठी का लागतो वेळ?
कोणत्याही मृतदेहाचे पोस्टमार्ट करण्यासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतात. यासाठी पोलिस पंचनामा, नातेवाईकाची सहमती, तज्ज्ञ डॉक्‍टरांची उपस्थिती आवश्‍यक असते. नैसर्गिक प्रकाशात पोस्टमार्ट केल्याने योग्य अहवाल व मृत्यूचे करण समजण्यास मदत होते. त्यामुळे अनेकदा पोस्टमार्टसाठी वेळ जातो.

'या' शहरातील मिश्रभाषेची नव्यांनाही पडतेय भुरळ 

असा होणार पोस्टमार्टेम विभाग
सोलापूरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्चार रुग्णालयात शेजारील उस्मानाबाद जिल्ह्यासह आंध्रप्रदेश व कर्नाटकातील रुग्णांची संख्या जास्त आहे. रुग्णालयात मृत्यू झाल्यास त्याचे पोस्टमार्टम करुनच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. येथील डॉक्‍टर व प्रशिक्षणासाठी असलेले विद्यार्थी, नातावाईक व पोलिस यांना येथे सुविधा मिळाव्यात म्हणून अत्याधुनिक पद्धतीने पोस्टमार्ट विभागाची उभारणी केली जाणार आहे. यामध्ये कोल्ड रुम असणार आहे. त्यात एकावेळी 40 मृतदेह ठेवण्याची क्षमता असणार आहे. गोवा पॅटर्नच्या धर्तीवर हे शवविच्छेदन गृह असणार आहे. त्यात नातेवाईंकासाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. याबरोबर पंचानामा करण्यासाठी "पोलिस पंचनामा' हा स्वतंत्र कक्ष असणार आहे. तेथील म्युझियम संग्रहालयाचेही आधुनिकीकरण होणार आहे. नातेवाईकांच्या शंका दूर व्हाव्यात म्हणून तेथील कारभारावर सीसीटीव्हीचाही वॉच राहणार आहे. पोस्टमार्टमसाठी लागणार वेळ कमी करण्यासाठीही यातून काहीप्रमाणात मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT