पश्चिम महाराष्ट्र

आईवडिलांकडे जाण्याऐवजी तिने कवटाळले मृत्युला 

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (जि. सोलापूर) ः तिने सासरच्या त्रासाला कंटाळून आईवडिलांकडे जाण्याऐवजी मृत्युला कवटाळले. मंगळवेढ्यातील या घटनेप्रकरणी सैन्यदलातील जवान पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत चारित्र्याचा संशय घेत वेळोवेळी घरातून बाहेर हाकलून देत शारीरिक व मानसिक त्रास देऊन विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सैन्यदलातील जवान पतीसह सेवानिवृत्त सासरे, सासू, नणंद, नणंदेचा पती अशा एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मृत रुक्‍मिणी शंकर सांगोलकर (वय 22) यांच्या आईने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुक्‍मिणी हिचा विवाह पौट येथील सेवानिवृत्त सैनिक अरविंद ज्ञानोबा सांगोलकर यांचा मुलगा शंकर याच्याबरोबर झाला होता. त्यासाठी लग्नात हुंडा, सोन्याचे दागिने दिले. 

त्यानंतरही मुलीचा वारंवार सासरी छळ होत होता. मंगळवेढा येथे घराचे बांधकाम करण्यासाठी पाच लाख रुपये आणण्यासाठी वारंवार तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. त्यावेळी असलेली जमीन नऊ लाखांना विकून त्यातील पाच लाख रुपये घराच्या बांधकामासाठी दिले, तरी देखील तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी घरातून बाहेर काढून मानसिक व शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न वारंवार होत होता, याबाबत त्यांना वारंवार सांगून देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. अखेरीस रुक्‍मिणी हिला 6 जानेवारी 2020 रोजी संध्याकाळी ठाणे येथील आई-वडिलांच्या घरी सोडण्यासाठी जाणार होते. दरम्यान, मंगळवेढा येथे राहत्या घरी छताच्या पंख्याला कापडी स्टोनच्या साह्याने गळफास घेऊन रुक्‍मिणी यांनी आत्महत्या केली. 

याबाबत जवान शंकर अरविंद सांगोलकर (पती), अरविंद जानोबा सांगोलकर (सासरा), लक्ष्मी अरविंद सांगोलकर (सासू, रा. पौट. ता. मंगळवेढा), पूजा हरी नवत्रे (नणंद), हरी ज्ञानू नवत्रे (नणंदेचा पती, रा. रड्डे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सोमवारी दिवसा घडली होती. मंगळवारी मृत रुक्‍मिणीचे आई-वडील अंबरनाथ (जि. ठाणे) येथून आल्यानंतर दिवसभर जबाबदार असणाऱ्यांवर अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी पोलिस ठाण्यात महिलांनी ठाण मांडले होते. दुपारी ग्रामीण रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केलेल्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. रात्री 10 नंतर पौट येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI ने पोस्ट केलेला स्पेशल Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT