Sangli Crime esakal
पश्चिम महाराष्ट्र

कृष्णा नदीत उड्या टाकून तरुणांनी हत्यारांसह फिरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला पकडले; धनगावच्या युवकांचे धाडस

Sangli Crime : शेरीभाग-आमणापूर येथे काल (ता. १०) सकाळी साडेदहाच्या दरम्यान १२ जण संशयित फिरताना दिसले.

सकाळ डिजिटल टीम

Palus Police : तरुणांची चोरांबरोबर जोरदार झटापट झाली. मात्र, तरुणांनी तिघांना पकडून भिलवडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

अंकलखोप : शेरीभाग-आमणापूर (ता. पलूस) येथे चोरीच्या उद्देशाने हत्यारांसह फिरणाऱ्या १२ जणांच्या टोळीतील काहीजणांना हटकल्यावर ते इकडे तिकडे पळू लागले. त्यातील काहींनी नदीत उडी घेतली. चोर काही केल्या पाण्यातून लवकर बाहेर पडेनात. त्यामुळे धनगावच्या काही युवकांनी नदी पात्रात उड्या टाकून त्यांना पाण्याबाहेर काढले. यावेळी त्यांची चोरांबरोबर जोरदार झटापट झाली. तिघांना धाडसाने पकडून भिलवडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

मात्र, रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शेरीभाग-आमणापूर येथे काल (ता. १०) सकाळी साडेदहाच्या दरम्यान १२ जण संशयित फिरताना दिसले. त्यांना शेरीभाग येथील तरुणांनी हटकले असता, त्यांनी गाडीचा घोटाळा झालाय, जुळेवाडीला निघाल्याचे सांगितले. तिथून निसटून त्यातील पुढे काहीजण भवानी टेक, धनगाव हद्दीतील शिवारात शिरले. तोवर स्थानिक तरुणांना संशय आल्याने त्यांनी लोकांची जमवाजमव केली.

जमावाने त्यांच्यादिशेने धाव घेतल्यावर काहींनी शेताकडे पळ काढला; तर तिघांनी कृष्णा नदीच्या पाण्यात उड्या घेतल्या. यावेळी त्यांची बॅग नागरिकांच्या हाती लागली. त्यामध्ये हत्यारे, कटावणे, पकडी, कपडे, सत्तूर, डोळ्यांसाठी भोके असणाऱ्या माकड टोप्या, लगोरी अशा वस्तूंवरून हे चोरच असल्याचे नागरिकांना लक्षात आले.

काही तरुण तोपर्यंत मोटारसायकलवरून नदीपलीकडे अंकलखोपला पोहोचले. त्यावेळी आमणापूर व अंकलखोपच्या नागरिकांनी भिलवडी पोलिसांनाही पाचारण केले. नुकताच कृष्णा नदीला पूर येऊन गेला होता. त्यामुळे नदी काठावर गाळ, काटे यांचा ढीग साचला होता. चोर काही केल्या पाण्यातून बाहेर पडेनात. त्यामुळे धनगावच्या काही युवकांनी नदीपात्रात उड्या टाकून त्यांना पाण्याबाहेर काढले. तीन चोर पाण्यातून वर येताच पकडले. तरुणांची चोरांबरोबर जोरदार झटापट झाली. मात्र, तरुणांनी तिघांना पकडून भिलवडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पलूस पोलिसांनीही शेरीभाग येथे धाव घेत चौकशी व इतर चोरट्यांचा तपास सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल नव्हता.

तरुणाई अधिक सतर्क

२३ जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास शेरीभाग, आमणापूर येथील अंकुश पाटील यांच्या घरातील तब्बल १७ तोळे दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारला होता. तसेच अनुगडेवाडीतही घरफोडी केली होती. तेव्हापासून सर्वत्र तरुणांनी गस्त घालायला सुरुवात केली होती. याकाळात गावात काहीजणांना रात्रीच्यावेळी काही संशयित दिसल्याचीही चर्चा होती. त्यामुळे तरुणाई अधिक सतर्क झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT