Agitation sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Fraud News : शंभर कोटींची फसवणूक! गुंतवणूकदार हवालदिल; आरोपी मोकाट

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आश्वासन देत पुणे जिल्ह्यातील सुमारे बाराशे जणांची तर राज्याच्या विविध भागांतील सुमारे आठ हजार जणांची तब्बल सुमारे शंभर कोटींची आर्थिक फसवणूक करणारे आरोपी मोकाट फिरत आहेत.

शाईनिंग स्टार कंपनी व इन्फिनिटी ग्रुपच्या या आरोपींवर ‘मोका’ तसेच आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कडक कारवाई व्हावी, या मागणीसाठी मानिनी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली समस्त संघर्ष समितीच्या वतीने गुंतवणूकदारांनी शुक्रवारी (ता. १२) पोलिस आयुक्तालयासमोर निदर्शने केली. शंभर कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपींना आशीर्वाद कुणाचा? असा प्रश्न उपस्थित करीत आरोपींवर कडक कारवाई न झाल्यास पुन्हा जनआंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

शाईनिंग स्टारच्या ऊर्मिला मोरे, गजानन मोरे, दयानंद मोरे, संतोष राठोड आणि इन्फिनिटी ग्रुपचा हनुमंत फाले यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, औरंगाबाद आणि राज्यातील विविध ठिकाणी हजारो गुंतवणूकदारांना आकर्षित करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा समितीचा आरोप आहे.

दरम्यान, याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या व्यक्तींनी कंपनी स्थापन करून, नियोजनबद्ध गुन्हेगारी कट रचून शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दहा टक्के परताव्याचे आमिष दाखवले. गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. भारतातून दुबई येथे फॉरेक्स शेअर मार्केटमध्ये हवाला माध्यमातून पैसे वर्ग करून गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

याप्रकरणी संबंधित महिला व तिच्या साथीदारांवर इंदापूर तसेच हिंजवडी व निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तपास योग्य रीतीने न केल्यामुळे या गुन्ह्यातील आरोपी मोकाट फिरत आहेत. दरम्यान, या गुन्हेगारांना वेळ मिळाल्याने त्यांनी गुंतवणूकदारांविरुद्ध छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी वाळुंज पोलिस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत.

या आहेत मागण्या

  • फसवणूक करणाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या निगडी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकावर कारवाई व्हावी.

  • शायनिंग स्टार व इन्फिनिटी ग्रुपवर कारवाई व्हावी

  • फसवणूक करणाऱ्यांचे बँक खाते सील करा

  • स्थावर, जंगम मालमत्ता जप्त करावी

  • गुंतवणूकदारांना पोलिस संरक्षण द्यावे

  • फसवणूक करणारे व तपासी पोलिस अधिकाऱ्यांचे लागेबांधे तपासावे

  • हिंजवडी, निगडी ठाण्यातील गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे द्या

  • आरोपींना तत्काळ अटक करा

आरोपींवर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत कडक कारवाई व्हावी, तसेच या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. फसवणूक करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांबाबतची माहिती मागवून पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले आहे.

- डॉ. भारती चव्हाण, संस्थापक अध्यक्षा, मानिनी फाउंडेशन

हिंजवडी पोलिस ठाण्यात ७ मे २०२४ रोजी ऊर्मिला मोरे, गजानन महादेव मोरे, दयानंद महादेव मोरे, संतोष खुबा राठोड यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. यामध्ये गजानन मोरे, दयानंद मोरे व अन्य एकाला अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

- श्रीकृष्ण कांदे, पोलिस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी, हिंजवडी पोलिस ठाणे

मी ६९ लाख रुपये गुंतवले आहेत. मात्र, कसलाही परतावा न देता तसेच मूळ रक्कमही न देता माझी फसवणूक केली आहे. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने आर्थिक नियोजन बिघडले आहे. संबंधित व्यक्तींवर योग्य कारवाई व्हावी.

- डॉ. रामचंद्र चव्हाण, गुंतवणूकदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT