पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांनो, सांभाळा! 17 कुटुंबात कोरोनाचा शिरकाव...

पीतांबर लोहार

पिंपरी : आज जागतिक कुटुंब दिन. वसुधैव कुटुंबकम् अर्थात सर्व विश्व एक कुटुंब आहे, असे आम्हाला आमची भारतीय संस्कृती शिकवते. आपल्या संतांनीसुद्धा हाच संदेश आम्हाला दिला आहे. पण, याच वसुधैव कुटुंबावर एक संकट आलं आहे. जागतिक महामारीचं संकट. कोरोना त्याचं नाव. अनेक कुटुंबांना त्याने पछाडले आहे. एकट्या पिंपरी-चिंचवड शहराचा विचार केल्यास जवळपास 17 कुटुंबातील 45 पेक्षा अधिक सदस्यांना संसर्ग झालेला आहे.

जवळपास सर्वच देशांतील कुटुंबांना कोरोनाने पछाडले आहे. पण, त्याची सर्वाधिक झळ भारतातील कुटुंबांना बसली आहे. बसते आहे. कारण, अनेक देशांमधून कुटुंब ही संकल्पना कधीच कालबाह्य झाली आहे. आपल्याकडे ती आजही टिकून आहे. भलेही 'छोटे कुटुंब, सुखी कुटुंब' या लोकसंख्या नियंत्रणासाठी दिलेल्या घोषवाक्याचा चुकीचा अर्थ घेऊन अनेक कुटुंब विभक्त झालेली असोत. पण, पती, पत्नी, मुले असे त्रिकोणी, चौकोनी कुटुंब आपल्याला बघायला मिळतात. अनेक कुटुंबांमध्ये आजी आजोबा आजही नातवंडांना गोष्टी सांगताना दिसतात. पण, अशा आनंदी कुटुंबांनाही कोरोनाने पछाडले आहे. कुटुंब व्यवस्थेला धक्का बसतो आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकट्या पिंपरी-चिंचवड शहराचा विचार केल्यास आजपर्यंत 183 जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यातील 48 जण हे 17 कुटुंबातील आहेत. म्हणजेच, एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्ती कोरोना बाधित झालेल्या आहेत. यात दीड महिन्यांच्या चिमुकलीपासून 70 वर्षांच्या आजीपर्यंतच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. काही ठिकाणी पती-पत्नी, काही ठिकाणी सासू-सुना, काही ठिकाणी वडील-मुलगा तर काही ठिकाणी कुटुंबातील चार-पाच जण बाधित झालेले आहेत. यातून बहुतांश जण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, चौदा दिवस उपचार, त्या अगोदर घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी दाखल झालेले दोन दिवस आणि चौदा दिवसांनंतर सलग चोवीस तासात करावी लागणारी तपासणी असे दोन दिवस म्हणजेच कुटुंबापासून किमान 19 ते 20 दिवस लांब राहायचे. आणि चौदा दिवस उपचारानंतरही तपासणी रिपोर्ट पुन्हा पाॅझिटिव्ह आला तर आणखी चौदा दिवस रुग्णालयात मुक्काम आणि उपचार ठरलेले. पिंपरी चिंचवड मध्ये अशा पाच व्यक्ती आढळल्या आहेत की, त्यांचे चौदा दिवस उपचारानंतरही रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजपर्यंत 116 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झालेला आहे. पण, सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. कारण, आपल्याला कुटुंब वाचवायचे आहे. त्यातील सदस्यांचं म्हणजे आई-वडील, पत्नी, मुले, भावंडं, शेजारी, कामातील सहकारी यांचं संरक्षण करायचे आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुटुंबांना बाधा

पिंपरी-चिंचवड शहरातील च-होली येथील तीन कुटुंबातील 11 जणांना बाधा झालेली आहे. त्यातील पती-पत्नी बरे झाले आहेत. एका कुटुंबातील तीन वर्षांचा मुलगा, दोन महिला आणि दुस-या कुटुंबातील कर्ता तरुण व दोन महिलांचा समावेश आहे. या तीनही कुटुंबांतील कर्ते पुरुष तरुण असून, अत्यावश्यक सेवेत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच, कासारवाडी व संभाजीनगर येथील दोन कुटुंबातील पती-पत्नी बाधित झाले होते. ते बरे झाले आहेत. जुनी सांगवीतील वडील व मुलगा बाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुपीनगरमधील तब्बल पाच कुटुंबातील मुले, महिला, पुरुष, ज्येष्ठ अशा 23 जणांना संसर्ग झाला. यात एक वर्षांचा मुलगा, तीन वर्षांच्या दोन मुली, त्यांच्या माता यांचाही समावेश आहे. तसेच, तळवडे, पिंपळे गुरव, भोसरी, दिघी, पिंपरीगाव येथील रुग्णही एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे एका व्यक्तीमुळे कुटुंबातील अन्य सदस्यांनाही बाधा होऊ शकते. ती टाळण्यासाठी सुरक्षित राहू, कुटुंबाला सुरक्षित ठेऊ, असा संकल्प जागतिक कुटुंब दिनानिमित्त करू या आणि कोरोना विरुद्ध यशस्वी लढा लढू या!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT