पिंपरी : शहरात सोमवारी २४६ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ५० हजार ३९९ झाली आहे. आज ३२६ जणांना डिस्चार्ज मिळाला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन लाख ४१ हजार २२८ झाली आहे. सध्या पाच हजार १०७ सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील सात रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत चार हजार ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत दोन हजार ५०९ रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार ५९८ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत चार लाख ९७ हजार ६५५ व्यक्तींनी लस घेतली आहे. सध्या १५४ मेजर व एक हजार १८६ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. येथील एक हजार ८५७ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. सहा हजार ८३२ जणांचे विलगीकरण केले.
मावळात दिवसभरात १२१ कोरोना रुग्ण
वडगाव मावळ तालुक्यात सोमवारी दिवसभरात १२१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनाग्रस्त दोन जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुक्त झालेल्या २०३ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या २२ हजार २० झाली आहे. आतापर्यंत ४४० जणांचा मृत्यू झाला आहे. २० हजार ७४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, गृह विलगीकरणातील सुमारे एक हजार जणांचा दहा दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची नोंद कोरोना मुक्तांमध्ये केली आहे. त्यामुळे कोरोनामुक्तांच्या संख्येत रविवारच्या तुलनेत सोमवारी एक हजारांनी वाढ झाली आहे. तळेगावातील सक्रिय रुग्णांची संख्या पाचशेने कमी झाली आहे.
सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या १२१ जणांमध्ये तळेगाव दाभाडे ६१, लोणावळा १४, साळुंब्रे व वराळे येथील प्रत्येकी सहा, साते पाच, वडगाव चार, नवलाख उंबरे, तळेगाव दाभाडे ग्रामीण व कामशेत येथील प्रत्येकी तीन, आंबी, चांदखेड, गहुंजे, इंदोरी, माळवाडी, आंबळे, नाणे, नाणोली तर्फे चाकण, सुदवडी, उर्से व वडिवळे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.