species of snakes sakal
पिंपरी-चिंचवड

Snake Species : मावळात आढळतात सापांच्या ३६ प्रजाती

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या आणि जैववैविध्यतेचा खजिना असलेल्या मावळ तालुक्यात विषारी आणि बिनविषारी मिळून तब्बल ३६ पेक्षा अधिक प्रकारच्या विविध प्रजातींच्या सापांचे वास्तव्य आहे.

गणेश बोरुडे

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या आणि जैववैविध्यतेचा खजिना असलेल्या मावळ तालुक्यात विषारी आणि बिनविषारी मिळून तब्बल ३६ पेक्षा अधिक प्रकारच्या विविध प्रजातींच्या सापांचे वास्तव्य आहे.

तळेगाव स्टेशन - सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या आणि जैववैविध्यतेचा खजिना असलेल्या मावळ तालुक्यात विषारी आणि बिनविषारी मिळून तब्बल ३६ पेक्षा अधिक प्रकारच्या विविध प्रजातींच्या सापांचे वास्तव्य आहे, असा दावा रौनक खरे आणि जिगर सोलंकी या सर्पमित्रांनी पुण्यातील सर्प अभ्यासक आत्माराम आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सर्वेक्षण आणि संशोधनाद्वारे केला आहे.

काय काळजी घ्यावी

  • आपल्या परिसरात आढळणारे सर्व साप विषारी नसतात, ही बाब लक्षात ठेऊन सावधान रहायला हवे

  • बाहेर फिरताना पायात बूट, रात्री जाताना टॉर्च, जमिनीवर झोपताना मच्छरदाणीचा वापर कटाक्षाने करावा

  • घराच्या बाजूला कचरा अथवा अडगळ, अडचण तयार करू नये

  • घरात किंवा घराच्या बाहेर भिंती अथवा जमिनीला असलेल्या भेगा, बिळे बुजवावेत

  • निसर्गाची हानी आणि पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे सापांचा अधिवास आणि आसरे धोक्यात आल्याने साप लोकवस्तीकडे

  • सापांच्या काही प्रजाती दुर्मिळ किंवा नष्ट होताहेत

  • सापांची निसर्गातील अन्न साखळीमध्ये खूप मोठी आणि महत्त्वाची भूमिका

  • सापांना मारू नये, ते मानवाचे मित्र असतात

रौनक आणि जिगर यांच्या संशोधनाकामी वनविभाग मावळ, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थांचे मोलाचे सहकार्य दोघांना लाभले. त्यांनी केलेल्या संशोधनातून निश्चितच भविष्यातील संर्पदंशांचे आणि सापांचेही बळी वाचतील.

- नीलेश गराडे, संस्थापक, वन्यजीव रक्षक मावळ संस्था

कोण आहेत संशोधक

  • रौनक खरे हे गेल्या १५ वर्षांपासून तर जिगर सोलंकी हे गेल्या चार

  • पाच वर्षांपासून वन्यजीवरक्षक मावळ संस्थांतर्गत तळेगाव दाभाडे मावळ परिसरात सर्प मित्र म्हणून करताहेत काम

  • घरात घुसलेले, अडकलेले, जखमी सापांना बाहेर काढून आवश्यक ते उपचार देत सापांना पुन्हा त्यांच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सोडणे हे या सर्पमित्रांची निष्काम सेवा

  • साप पकडल्यानंतर त्याचे रंग, रुप, आकारासह हालचालींचे सूक्ष्म निरीक्षण

  • विषारी की बिनविषारी असे वर्गीकरण करून, साप चावल्यास घ्यावयाच्या उपचारांबद्दल जनजागृती

  • गत काही वर्षांत मावळातील विविध ठिकाणी पकडलेल्या सापांच्या छायाचित्रांसह इतर निरीक्षणांच्या नोंदी ठेवून त्यावर एक विस्तृत अहवाल सादर

  • विशेष म्हणजे हाच संशोधन अहवाल सिबटेक जर्नल ऑफ झुऑलॉजी भाग ११ मध्ये प्रकाशित

काय केले संशोधन

  • मावळ तालुक्यातील विविध भागांत आढळलेल्या सापांच्या विविध ३६ प्रजातींमधील केवळ आठ प्रकारचे साप विषारी

  • विषारी आठपैकी केवळ चार प्रजातीचे नाग, घोणस, मण्यार, फुरसे हे प्रामुख्याने लोक वस्तीत आढळतात

  • अन्य चार प्रकारचे साप दुर्मिळ असून मुख्यत्वे ते जंगलात आढळून येतात

  • तर विषारी चार प्रकारच्या सापांमधील कोणताही साप चावल्यास घाबरून न जाता, वेळेत त्याच्यावर उपचार होणे गरजेचे

  • २८ सापांपैकी सर्वात जास्त दृष्टीस पडणारे साप हे बिनविषारी

  • धामण, दिवड, नानेती, कवड्या, तस्कर, गवत्या आणि वाळा हे साप लोकवस्तीत आढळतात

  • मंजऱ्या, रुका हे झाडांवर वास्तव्य करणारे बिनविषारी साप

  • सापांच्या या प्रजातींपासून मानवाच्या जीवास कुठलाही धोका संभवत नाही

  • हे साप खाद्याच्या अथवा आसऱ्याच्या शोधात लोकवस्तीत येतात

  • उंदीर, बेडूक, पाल, सरडा आणि इतर छोटे साप हेच त्यांचे खाद्य

  • दोघा संशोधकांकडून मावळातील सर्वेक्षणासोबतच सर्पदंशानंतरचे प्रथमोपचार आणि गैरसमजूंतीबद्दल जनजागृती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT