mucormycosis Sakal
पिंपरी-चिंचवड

म्युकरमायकोसिसचे पिंपरी-चिंचवडमध्ये ४१ रुग्ण

कोरोनातून बरे झालेल्या शहर परिसरातील ४१ रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार आढळून आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोनातून (Corona) बरे झालेल्या शहर परिसरातील ४१ रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा बुरशीजन्य आजार (Sickness) आढळून आला आहे. या आजाराची गंभीर दखल महापालिकेने (Municipal) घेतली असून, अशा रुग्णांवर वायसीएम रुग्णालयात (YCM Hospital) उपचार (Treatment) सुरू आहेत. त्यासाठी चार डॉक्टरांची (Doctor) नियुक्ती केली आहे. आतापर्यंत त्यांनी १५ रुग्णांवर शस्त्रक्रिया (Surgery) केली आहे. (41 Patients with Mucormycosis in Pimpri Chinchwad)

कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर म्युकरमायकोसिस रुग्ण आढळू लागले आहेत. या आजारात काळसर बुरशीचा संसर्ग वाढून प्रसंगी त्याचा प्रादुर्भाव डोळे व मेंदूपर्यंत होऊ शकतो. हवेतून प्रसार होणारे स्पोअर्स नाका-तोंडातून शरिरात प्रवेश करतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती क्षीण झालेले, रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित असलेल्या मधुमेही रुग्णांना संसर्ग होऊ शकतो. त्यासाठी काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण, रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या मधुमेही रुग्णांना वरच्या जबड्यात आणि वरच्या जबड्याच्या वर असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनसमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे अशा रुग्णांवर जबड्याच्या व जबड्याच्या वरील सायनसच्या शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत, असे वायसीएमचे दंतरोग विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी सांगितले. त्यांच्यासह कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. अनिकेत लाठी, डॉ. आदित्य येवलेकर व डॉ. कौस्तुभ कहाणे रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करीत आहेत.

दृष्टिक्षेपात रुग्ण

  • ४१ - एकूण

  • १५ - शस्त्रक्रिया

  • ९ - मृत्यू

(म्युकरमायकोसिस झालेल्या आठ रुग्णांचा शस्त्रक्रियेपूर्वी व एकाचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT