पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या 'समता सैनिक दल' या संघटनेचा 90 वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी एका रुग्णवाहिकेचं लोकार्पण तसेच समता ग्रंथालयाचं उद्घाटनं करण्यात आलं. समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. (90th anniversary of Samata Sainik Dal ambulance inaugurated by Bhimrao Yashwant Ambedkar)
१९ मार्च २०२३ रोजी समता सैनिक दलाचा वर्धापन दिन पार पडला. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड इथं जनतेवर समता सैनिक दलाच्यावतीनं आंबेडकर यांच्या हस्ते हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानपत्र प्रदान करत जाहीर सत्कार करण्यात आला.
SSD रुग्णवाहिकेचं लोकार्पण
याप्रसंगी Pay Back to society समाजाचा पैसा समाजासाठी या भावनेतून सर्वसामान्य जनतेसाठी रुग्णवाहिकेचं लोकार्पण आणि समता ग्रंथालयाचं उद्घाटन पार पडलं. यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणं 'गाव तिथं शाखा' आणि 'घर तिथं समता सैनिक' उभा राहिलं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
काय आहे समता सैनिक दल?
समता सैनिक दल (SSD) ही एक सामाजिक संघटना आहे. १३ मार्च १९२७ रोजी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या संस्थेची स्थापना केली होती. समाजिक न्याय आणि भारतातील पीडितांची प्रतिष्ठा जपणं हा या संघटनेच्या स्थापनेमागील उद्देश होता. 'भारतात सामाजिक एकता स्थापित व्हावी' हे समता सैनिक दलाचं ब्रीद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.