पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नगररचना योजना (टीपी ) मांजरी खुर्द-कोलवडी क्रमांक-11, औताडे-हांडेवाडी योजना क्रमांक-3 च्या सुनावणीला 3 हजार300पैकी अवघे शंभर जमीनमालक हजर राहिले होते. कोरोना संसर्गामुळे 22 ते 25 जून, 15 ते 23 जुलै व 7 ते 11 सप्टेंबरच्या तीन टप्प्यातील सुनावणीला 317 हेक्टर मालकीचे भूखंडधारक उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यांत दोन टप्प्यांत पुन्हा सदर सुनावण्या होणार असल्याचे नगररचना सहायक संचालक व लवाद धनंजय खोत यांनी 'सकाळ' प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र नगररचना योजना नियम 1974 मधील नियम 13 (9) अन्वये महाळुंगे-माण नगररचना योजना क्र. 1 सर्व मिळकतधारक व हितसंबंधित व्यक्तींना 14 फेब्रुवारीला अवलोकनासाठी उपलब्ध करण्यात आली होती. मात्र, नोटिशीव्दारे माहिती देऊनही जमीन बाधितांनी पाठ फिरवली. पीएमआरडीएमध्ये म्हाळुंगे-माण या नगररचना योजना क्रमांक 1 च्या योजनेनंतर पुढील प्रारुप नगर योजना क्र. 3 व 11 च्या सुनावण्यांची अंमलबजावणी लवादाच्या माध्यमातून सुरु आहे. भूधारकांना सुनावण्यांची पूर्वसूचना नोटिशीद्वारे संबंधित पत्त्यावर देण्यात आली होती.
पहिल्या टप्प्यात मांजरी खुर्द, कोलवडीच्या 29 अंतिम भूखंडधारकांना बोलावण्यात आले. त्यानंतर औताडे-हांडेवाडी या योजनेतील 73 भूखंडधारकांना जुलै व संप्टेबर महिन्यात या दोन टप्प्यात बोलावण्यात आले होते. मात्र, तीनही सुनावण्यांना जेमतेम 100 जमीन मालक हजर राहिले. तब्बल 3200हून अधिक जमीनमालक सुनावणीला आले नाहीत. यादरम्यान जमीन मालकांच्या सूचना व तक्रारी नोंदवून घेतल्या जातात. त्यांच्या वैयक्तिक सूचनांचा विचार केला जातो. हे सर्व लेखी स्वरुपात घेतले जाते. त्यामुळे पुढील टीपी स्कीमला जमींनीचा मोठा अडथळा निर्माण होणार असल्याची चिन्हे आहेत. लवादालाही या जमिनींचा तोडगा काढणे लॉकडाउनच्या बदलत्या परिस्थितीमुळे अवघड जाणार असल्याचे दिसून आले आहे.
औताडे हांडेवाडी व मांजरी खुर्द-कोलवडी या दोन्ही नगररचना योजनांचे कामकाज सुरु आहे. कोरोना संसर्गामुळे जमीन मालक सुनावण्यांना उपस्थित राहिले नाहीत.पीएमआरडीए हद्दीतील बराच भाग मार्च महिन्यामध्ये कंटेन्मेंट झोनमध्ये होता. त्यामुळे सुनावण्या प्रलंबित राहिल्या आहेत. जमीनधारकांसाठी पुन्हा सुनावण्यांचे नियोजन करून ऑक्टोंबरमध्ये संधी देणार आहोत. -धनंजय खोत, लवाद, पीएमआरडीए
नगर रचना योजना भूखंड (हेक्टरमध्ये) भूधारक
औताडे हांडेवाडी - 94 1800
मांजरी खुर्द, कोलवडी - 223 1500
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.