पिंपरी : आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज (DY Patil College) ऑफ फार्मसीचा विद्यार्थी अक्षय बावस्कर याने औषधनिर्माण शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या नायपर जेईई-२०२१ (Niper JEE) परीक्षेत सुयश यश प्राप्त केले आहे. त्याने दिव्यांग प्रवर्गातून देशभरातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. ही प्रवेश परीक्षा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, हैदराबाद या स्वायत्त दर्जा असलेल्या संस्थेतर्फे घेतली. (Akshay Bawaskar Success Niper JEE exam First Handicapped category across the country)
अक्षय हा मूळचा औरंगाबाद जिल्ह्यातील घाणेगावचा रहिवासी आहे. सध्या तो परिवारसोबतच आकुर्डीत वास्तव्याला आहे. चार जणांचे कुटुंब असून वडील मजूर आहेत तर आई गृहिणी आहे. मोठी बहीण मुंबईला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करते. तो १४ वर्षांचा असताना त्याला तीव्र ऑस्टियोमाइलाइटिस हा आजार झाला. त्यानंतर उपचारासाठी तो पुण्यात दाखल झाला. उपचार पद्धती खूप दिवसांची असल्याने त्याने त्याचे शिक्षण सुद्धा पुण्यातच सुरू केले, उपचार सुरू असताना त्याच्या पायावर चार शस्त्रक्रिया केल्या होत्या.
अक्षयला औषधनिर्माणशास्त्राची आवड असल्याने त्याने बी. फार्मसीला प्रवेश घेतला. एमएस. फार्मास्युटिक्स विभागामध्ये ३३९ ही राष्ट्रीय स्तरावरील रँक प्राप्त केली. तर दिव्यांग प्रवर्गामध्ये देशात प्रथम आला आहे. आपल्या दिव्यांगावर मात करत अक्षय ने खूप मेहनत करून नायपर या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवले आहे. त्याला मोहाली (पंजाब) येथील नायपर संस्थेमध्ये फार्मास्युटिक्स या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घ्यायची आहे. त्याने चार वर्षांच्या बी. फार्मसी कोर्समध्ये विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. आणि सर्व स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळविला आहे.
स्पर्धात्मक परीक्षा समन्वयक प्रा.पवनकुमार वानखेडे यांनी स्वतंत्र मार्गदर्शन तासिका घेतल्या. वर्षभर घेतलेल्या विशेष तासिका तसेच परीक्षा, अभ्यासाचे सुनियोजन व विद्यार्थ्यांची मेहनत या मुळेच अक्षयला यश प्राप्त झाल्याचे प्राचार्य डॉ.नीरज व्यवहारे यांनी सांगितले. दरम्यान, नायपर ही औषधनिर्माणशास्त्र शाखेची देशातील अग्रगण्य संस्था असून भारत सरकारद्वारे तिला इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स हा दर्जा बहाल केलेला आहे.
देशात नायपरच्या एकूण सात संस्था असून त्या मोहाली, हैदराबाद, अहमदाबाद, कोलकता, रायबरेली, गुवाहाटी व हाजीपूर येथे स्थित आहेत. औषध संशोधनामध्ये या सर्व संस्था अग्रगण्य असून त्यामध्ये प्रवेश मिळावा. हे फार्मसीच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. नायपर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मेरीट नुसार एम.फार्म., एम.बी ए. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.