Rajesh Patil Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी शहरातील सर्व दुकाने सोमवारपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत राहणार सुरू

कोविड संसर्गाचा पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड ऑक्यूपन्सी विचारात घेता पिंपरी चिंचवड शहरातील निर्बंध सोमवारपासून (ता. २१) काही अंशी शिथील करण्यात येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोविड संसर्गाचा (Corona Infection) पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) आणि ऑक्सिजन बेड ऑक्यूपन्सी विचारात घेता पिंपरी चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad City) निर्बंध सोमवारपासून (ता. २१) काही अंशी शिथील (Relax) करण्यात येत आहेत. सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने शनिवार व रविवारी बंद राहतील, असा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी शनिवारी काढला. (All Shops in Pimpri Chinchwad will be Open from Monday till 7 pm)

नवीन आदेशानुसार, सार्वजनिक वाचनालय सुरु राहतील. स्पर्धा परीक्षा किंवा कोचिंग क्लासेस, अभ्यासिका, ग्रंथालय, प्रशिक्षण संस्था, मॉल ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. मात्र, सिनेमागृह, नाट्यगृह, संपूर्णतः बंद राहतील. व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार फक्त सोमवार ते शुक्रवार सुरु राहतील. मात्र सदर ठिकाणी वातानुकूल सुविधा वापरता येणार नाही. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने व गाळे, मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील. रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. फक्त घरपोच सेवा रात्री ११ पर्यंत सुरु राहील, स्वतः जावून पार्सल आणणे बंद राहील. शनिवार व रविवार फक्त घरपोच सेवा रात्री ११.०० पर्यंत सुरु राहील. सार्वजनिक ठिकाणे ( उद्याने ), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी पाच ते नऊ व दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा व कोविड १९ व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये सुरु राहतील.

  • शासकीय कार्यालये (अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणा-या कार्यालयां व्यतिरिक्त) ५० टक्के अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. उपरोक्त कार्यालये / आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी.

  • सुट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.

  • सर्व आउटडोअर स्पोर्ट्स आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील. तसेच इनडोअर स्पोर्ट्स पहाटे पाच ते सकाळी नऊ व सायंकाळी चार ते सात या वेळेत सुरु राहतील.

  • सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रमास ५० लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी सात वाजेपर्यंत परवानगी राहील.

  • लग्न समारंभ कार्यक्रम हे हॉलच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.

  • अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.

  • विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा या ५० टक्के उपस्थितीत घेणेस परवानगी राहील.

  • बांधकामे नियमितपणे सुरु राहतील.

  • ई - कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.

  • पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास (जमावबंदी ) प्रतिबंध राहील. तसेच रात्री १० नंतर अत्यावश्यक कारण वगळता संचारबंदी लागू राहील.

  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपीच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु राहील.

  • माल वाहतूक करणा-या वाहनांना व त्यामध्ये जास्तीत जास्त तीन व्यक्ती ( चालक + क्लीनर / मदतनीस ) यांना इतर प्रवाश्यांना लागू असलेल्या नियमानुसार प्रवास करणेस परवानगी राहील.

  • खाजगी वाहनातून, बसेस तसेच लांब अंतराच्या रेल्वे मधून आंतर जिल्हा प्रवास करण्यास परवानगी राहील. मात्र सदर वाहने शासनाने घोषित केलेल्या लेवल पाच मधील ठिकाणी थांबणार असतील तर ई-पास असणे बंधनकारक राहील. अशावेळी वाहनामधून प्रवास करणा-या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र ई-पास आवश्यक राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT