Aandar-Maval sakal
पिंपरी-चिंचवड

Andar Maval : आंदर मावळ नव्हे; तर हे आहे मावळातील मिनी काश्मीर!

पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या टाकवे गावापासून आंतर मावळ परिसर सुरू होतो. तेथे डोंगराळ व दुर्गम असा भाग आहे.

विजय सुराणा

तळेगाव दाभाडे - आंदर मावळ म्हणजे मावळातील मिनी काश्मीर. एका बाजूला ठोकळवाडीचा धरणाचा जलाशय, हिरवीगार भात शेती, डोंगरावरून कोसळणारे धबधबे या सर्व वातावरणामुळे पर्यटकांना वेगळाच आनंद मिळत आहे. एका दिवसाच्या सहलीसाठी आंदर मावळ हे ठिकाण अतिशय योग्य आहे.

पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या टाकवे गावापासून आंतर मावळ परिसर सुरू होतो. तेथे डोंगराळ व दुर्गम असा भाग आहे. या भागात १९२२ मध्ये बांधलेले टाटांचे ठोकळवाडी धरण असून सुमारे पंचवीस किलोमीटरपर्यंत त्याचा जलाशय आहे. या धरणाच्या वेढ्यावर सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर चाळीस गावे व वाड्या-वस्त्या आहेत. डाव्या बाजूला टाकवे, वडेश्वर, खांडी तर उजव्या बाजूला टाकवे, भोयरे, सावळा असे धरणाच्या दोन्ही बाजूंनी जाणारे रस्ते आहेत. दोन्ही बाजूंच्या डोंगरामध्ये धरणाचा जलाशय पसरलेला आहे.

धबधब्याची रांग

हिरव्यागार डोंगररांगातून फेसाळत खाली येणारे लहान-मोठे धबधबे. वडेश्वरजवळील माऊच्या मोरमारवाडी येथून धबधब्याची रांग सुरू होते. वडेश्वरजवळील डोंगरावरपासून पुढील दहा किलोमीटरच्या अंतरावर नागाथली, वहाणगाव, डाहुली, कुसवली, कांब्रे बोरवली या गावांजवळ अनेक धबधबे कोसळताना दिसतात.

कोकणचे विहंगम दृश्य

चढ-उताराची नागमोडी वाट, आजूबाजूला हिरवीगार भातशेती, डोंगरावरून वाहणारे पाण्याचे पाट अशी दृश्ये नजरेत सामावून घेत आपण आंदर मावळचे शेवटचे टोक असलेल्या खांडी गावात कधी पोहोचतो. तेच समजत नाही. खांडी येथे टाटा पॉवर कंपनीचे अठरा क्रमांकाचे गेट आहे. वीजनिर्मितीसाठी ठोकळवाडी धरणाचे पाणी येथून खाली सोडले जाते. मात्र, तेथे जाण्यास मनाई आहे. त्याच्या बाजूच्या पठारावर गेल्यास कोकणचे विहंगम दृश्य नजरेस पडते. धुक्याच्या पाठशिवणीचा खेळही येथे पाहावयास मिळतो.

माळेगाव खुर्द, इंगळूनही धबधबे

टाकवे-भोयरे सावळामार्गे गेल्यास माळेगाव खुर्द, किवळे, इंगळून या गावांजवळही अनेक धबधबे आहेत. जोरदार वाऱ्यामुळे धबधब्यातून खाली पडणाऱ्या पाण्याचे अनेकदा कारंज्यात रूपांतर झाल्याचे दिसून येते. धरणाच्या दोन्ही बाजूंना निसर्गरम्य वातावरणात अधूनमधून कोसळणाऱ्या जलधारा अंगावर घेत केलेली भटकंती पर्यटकांना वर्षाविहाराचा वेगळाच आनंद मिळवून देते.

काय पाहाल ?

  • माऊ, मोरमारवाडी, वडेश्वर, नागाथली, कुसवली, बोरवली येथील धबधबे

  • बोरवली येथील अंजनी माता मंदिर, हिरवीगार भातशेती

  • निळशी येथील ठोकळवाडी धरण

  • खांडीजवळील पठारावरून कोकणचे विहंगम दृश्य

ही खबरदारी घ्या...

  • आंदर मावळातील रस्ते अरुंद

  • पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा

  • वाहने चालवताना काळजी घेणे गरजेचे

  • धबधब्यांपर्यंतची वाट निसरडी

  • प्रवासापूर्वीच वाहनांची देखभाल-दुरुस्ती करून घ्यावी

आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाइन...

  • वडगाव पोलिस ठाणे - ०२११४-२३५३३३

  • कामशेत चौकी - ०२११४- २६२४४०

  • टाकवे आरोग्य केंद्र, कान्हे रुग्णालय - ०२१४४-२५५४२१

पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी नको ते धाडस करून आपला जीव धोक्यात घालू नये. बंदी असलेल्या ठिकाणी पर्यटनास गेल्यास कडक कारवाई केली जाईल.

- सत्यसाई कार्तिक, सहायक पोलिस अधीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT