Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi sohala sakal
पिंपरी-चिंचवड

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : माउलींच्या पालखीवर आळंदीत पुष्पवर्षाव

रांगोळ्यांच्या पायघड्या... बॅण्डचा ताल... अन्‌ रस्त्यावर दुतर्फा उभ्या असलेल्या आळंदीकरांनी माउलींचा जयघोष करत पालखी रथावर पुष्पांचा वर्षाव केला.

सकाळ वृत्तसेवा

आळंदी - रांगोळ्यांच्या पायघड्या... बॅण्डचा ताल... अन्‌ रस्त्यावर दुतर्फा उभ्या असलेल्या आळंदीकरांनी माउलींचा जयघोष करत पालखी रथावर पुष्पांचा वर्षाव केला. जल्लोषपूर्ण आणि भारलेल्या पहाटेच्या वातावरणात ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत लाखो वारकऱ्यांसमवेत संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला.

माउलींना निरोप देण्यासाठी आलेल्या भावुक आळंदीकरांनी पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत सोहळ्यास भावपूर्ण निरोप दिला. यावेळी अनेक आळंदीकर माउलींच्या सोहळ्यासोबत वडमुखवाडीतील थोरल्या पादुका मंदिरापर्यंत चालत गेले होते.

शनिवारी (ता. २९) माउलींच्या प्रस्थानानंतर रात्री आजोळघरी पालखी मुक्कामी विसावली. रात्री समाज आरती झाल्यानंतर भाविकांचे दर्शन सुरू होते. आळंदीकर आणि परिसरातील नागरिकांनीही दर्शनासाठी पहाटे दोनपर्यंत गर्दी केली होती. त्यानंतर दर्शन बंद ठेवण्यात आले. रात्रभर अखंड भजन आणि माउलींचा गजर ठिकठिकाणी सुरू होता.

पहाटे आळंदीतील सुधीर गांधी, अवधूत गांधी आणि कुटुंबीयांकडून माउलींच्या पादुकांना रूद्राभिषेक, पाद्यपूजन विधिवत करण्यात आले. देवस्थानच्या वतीनेही माऊलींची पहाट पूजा आणि आरती करण्यात आली. यानंतर शितोळे सरकार यांच्यावतीने माउलींना नैवेद्य दाखविण्यात आला.

पहाटे सहा वाजता माउलींच्या मानाच्या घोड्याचे आगमन झाल्यानंतर विठूनामाच्या गजरात पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. तत्पू्र्वी पहाटेपासून वारकरी दिंड्यांसह बाहेर पडत होते. दिंड्यांचे ट्रक मध्यरात्रीतून तर काही पहाटेच्यावेळी सोहळ्या अगोदर पुण्याच्या दिशेने सोडण्यात आले. दरम्यान आजोळ घरातून पालखी बाहेर आल्यानंतर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला.

पालिका चौकामध्ये फुलांनी सजविलेल्या रथामध्ये पालखी ठेवण्यात आली. रथाला आळंदीतील सहादू कुऱ्हाडे कुटुंबीयांची बैलजोडी जुंपण्यात आली आहे. रथाची संपूर्ण सजावट आळंदीतील सुदीप गरुड कुटुंबीयांनी केली. रथामध्ये पालखीच्या स्वागताला मुख्याधिकारी कैलास केंद्रे सामोरे गेले.

यावेळी पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर, बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, उद्धव चोपदार, ज्ञानेश्वर वीर यांचा सन्मान केला.

वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पाणी, बिस्किटे, पोहे, राजगिरा लाडू, चिक्कीचे वाटप केले जात होते. सकाळी साडे नऊ वाजता माउलींची पालखी थोरल्या पादुका येथे पोचली. यावेळी येथील ज्ञानेश्वर मंदिरात पालखी सोहळा ऋषिकेश आरफळकर आणि राजाभाऊ आरफळकर यांनी हातात पादुका घेऊन तेथील माउलींच्या पुढे स्थानापन्न केल्या.

थोरल्या पादुका देवस्थानचे विश्वस्त अॅड. विष्णू तापकीर, संतोष तापकीर यांनी पादुकांना पंचामृत स्नान घातले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी महापौर नितीन काळजे यांची उपस्थिती होती. त्यानंतर आरती करून पालखी सोहळा दिघी, कळस, फुलेनगर मार्गे पुण्याकडे दोन दिवसांच्या मुक्कामी मार्गस्थ झाला.

ग्रामस्थांचे डोळे पाणावले

पुणे आळंदी रस्त्यावर ठिकठिकाणी लोकांचा समुदाय सोहळा पाहण्यासाठी जमला होता. एकामागून एक दिंड्या खांद्यावर भगव्या पताका घेऊन टाळ मृदंगाच्या निनादात विठूनामाचा गजर करत पंढरीकडे निघाल्या. पालखीने जुना पूल ओलांडल्यानंतर निरोप देण्यासाठी जमलेल्या आळंदीकर ग्रामस्थांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. तर काही आळंदीकर पुण्यापर्यंत सोहळ्याबरोबर चालत आले होते. पंढरीकडे निघालेली माउली आता महिनाभरानेच भेटणार यामुळे आळंदीकरांचे अंतःकरण जड झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

Virat Kohli च्या रनमशीनला ब्रेक! १७ वर्षात सर्वाधिक कमी सरासरीची नोंद, पाहा प्रत्येक वर्षाचा बॅटिंग अ‍ॅव्हरेज

Nashik Vidhan Sabha Vote Counting: देवळालीचा निकाल सर्वप्रथम, नाशिक पश्‍चिम सर्वांत उशिरा; जिल्ह्यात उद्या मतमोजणी

Latur Assembly Election 2024 : अठरा हजार कोटी निधी आणल्याचा दावा, पण विकास दिसला का?

SCROLL FOR NEXT