पिंपरी-चिंचवड शहरात शेकडो कंपन्या आणि हजारो कामगार आहेत. सर्वांनाच कंपनीमधील जेवण मिळतेच असे नाही आणि सर्वांनाच घरचेच जेवण मिळतेय असेही नाही. त्यात नोकरी पुन्हा शिफ्टची. दर आठवड्याला बदलणारी. घर ते कंपनीचे अंतर दीड-दोन तासांचे. डबा तयार करण्यासाठी गृहिणीला खूप लवकर उठावे लागते. तिचा तारांबळ उडते. या साऱ्यात मग हातगाडी, खानावळींचा आधार घेतला जातो. तेही पोटाला पचेलच आणि खिशाला परवडेलच असं नाही. आता हे सारे टळून ‘घरचा डबा’ मिळाला तर? मुंबईच्या धर्तीवर हीच संकल्पना ‘पुण्याची डबेवाली’ लवकरच पिंपरी-चिंचवड शहरात प्रत्यक्षात येत आहे.
शहरात दुर्गा ब्रिगेड ही महिला चळवळीतील संघटना आहे. विविध क्षेत्रात काम करणारी ही स्वयंसेवी संस्था काही महिलांना रोजगार देण्यात यशस्वी झाली आहे. संघटनेची ताकद खूप मोठी नाही. मात्र, आता चांगली ओळख बनली आहे. आपल्या नव्या उपक्रमाविषयी या संघटनेचे नेतृत्व करणारी दुर्गा भोर ही युवती म्हणाली, मी उद्योजक घरातील आहे. त्यामुळे मला उद्योजकांबरोबरच कामगारांचे प्रश्न चांगल्या प्रकारे माहीत आहेत. लॉकडाउन काळात तर औद्योगिक क्षेत्राला किती मोठा फटका बसला याची साऱ्यानांच कल्पना आहे. असेच एकदा संघटनेच्या बैठकीत चर्चा करत असताना कामगारांच्या जेवणाचा प्रश्न असा विषय समोर आला आणि कल्पना सुचली. याचा अंतिम आराखडा तयार झाला असून जूनमध्ये प्रत्यक्षात ‘पुण्याची डबेवाली’ हा उपक्रम सुरू होईल.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
Edited By - Prashant Patil
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.