MIDC Workers sakal
पिंपरी-चिंचवड

Bhosari MIDC : विद्युत पुरवठा तेरा तासांपेक्षा अधिक काळ खंडित; लघु उद्योजकांचे लाखो रुपयांचे नुकसान

भोसरी एमआयडीसीतील विद्युत पुरवठा बुधवारी (ता. ३१) बारा तेरा तासापेक्षा अधिक काळ खंडीत राहिल्याने लघुउद्योजकांना यंत्रे बंद ठेवावी लागली.

सकाळ वृत्तसेवा

भोसरी - भोसरी एमआयडीसीतील विद्युत पुरवठा बुधवारी (ता. ३१) बारा तेरा तासापेक्षा अधिक काळ खंडीत राहिल्याने लघुउद्योजकांना यंत्रे बंद ठेवावी लागली. उत्पन्न घटले त्यातच कामगारांनाही बसून पगार देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्याचप्रमाणे ठरलेला तयार माल ठराविक वेळेत मोठ्या कंपनीत न गेल्याने त्या कंपन्यांचे डेबीटही सहन करावे लागणार आहे. त्यामुळे लघुउद्योजकांनी संताप व्यक्त केला आहे.

भोसरीतील जे, डब्ल्यू, एस ब्लॉकसह इंद्रायणी प्राधीकरणातील पेठ क्रमांक सात व दहामधील विद्युत पुरवठा गुरुवारी पहाटे तीन वाजल्यापासून खंडीत झाला. तो दुपारी चार वाजल्यानंतरही सुरळीत झाला नव्हता. सलग विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने कंपनीतील यंत्रांचा घणघणाट अखंडपणे बंद राहिला. कंपन्यांमध्ये कामगार बसून होते. कंपन्यांचे वीज बील थकल्यानंतर वीज जोड तातडीने तोडण्याची कारवाई महावितरणद्वारे केली जाते.

वीज जोड तोडण्याची तत्परता दाखविणाऱ्या महावितरणद्वारे एमआयडीसीतील विद्युत पुरवठा बारा तासाहून अधिक काळ खंडीत झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणतीच ठोस पाऊले उचलली जात नसल्याबद्दल लघुउद्योजक वसंत टिळेकर, संजय सातव, संजय भोसले, सूर्यकांत बेलोसे, सूर्यकांत पोखरकर, पंढरीनाथ बांगर आदी लघुउद्योजकांनी संताप व्यक्त केला आहे.

भोसरी एमआयडीसीतील महावितरणच्या जुन्या कामगारांची बदली झाली असून येथे नवीन शिकाऊ व कंत्राटी कामगार भरले आहेत. या कामगारांना वीज जाण्याचे नेमके कारण या समजून येत नसल्याने विद्युत पुरवठा अधिक काळ खंडीत राहिल्याचा आरोप काही लघुउद्योजकांनी महावितरणवर केला आहे.

मात्र महावितरणचे कार्यकारी अधिकारी अतुल देवकर यांनी सांगितले, की महावितरणकडे अनुभवीच कामगार काम करत आहेत. बुधवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे केबल टर्मिनेटर कीटमध्येही बिघाड झाला. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अडचणी उद्भवल्या.

गेल्या एक महिन्यांपासून भोसरी एमआयडीसीत विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होण्याचा प्रकार घडत आहे. मात्र बुधवारी तेरा तासांपेक्षा अधिक काळ खंडीत झालेल्या विद्युत पुरवठ्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. ही समस्या महावितरणणे तातडीने सोडविली नाही, तर महावितरण विरुद्ध लघुउद्योजकांद्वारे उपोषण करण्यात येणार आहे.

- तुकाराम बांगर, लघुउद्योजक, भोसरी एमआयडीसी.

भोसरी एमआयडीसीमध्ये माझे दोन युनीट सुरू आहेत. महिंद्रा आणि टेल्को कंपनीला लागणारे सुट्टे भाग गुरुवारी वेळत पोचले नाहीत. त्यामुळे या कंपन्यांचेही काम ठप्प झाले होते. आता या कंपन्यांद्वारे उशीरा सुट्टे भाग पोचल्याचे डेबीट लावण्यात येणार आहे. बुधवारी सकाळपासून महावितरणशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र महावितरणच्या कोणत्याही अनुभवी अधिकाऱ्याने घटना स्थळास भेट देण्याचे टाळले. नंतर त्यांनी दूरध्वनीलाही प्रतिसाद न दिल्याने लघुउद्योजकांच्या अडचणीत वाढ झाली.

- संजय वाबळे, लघुउद्योजक व माजी नगरसेवक.

पावसाळ्यात वीज पडल्यानंतर तात्काळ विद्युत पुरवठा खंडीत होण्यासाठी परिसरात लाईटनिंग अरेस्टर (एलए) उपरकरणे प्रत्येक विद्युत डीपीमध्ये तीन-तीन बसविण्यात आली आहेत. यामुळे वीज पडल्यानंतर तातडीने विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने इतर विद्युत उपकरणांचे नुकसान होत नाही. मात्र बुधवारी ही उपकरने एकानंतर एक उडत होती. विद्युत पुरवठा खंडीत झालेल्या भागात सुमारे दोनशे विद्युत डीपी असल्याने ती उपकरणे शोधून ती दुरुस्त करण्यात अधिक वेळ जाऊन विद्युत पुरवठा खंडीत झाला. यंत्रणा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

- अतुल देवकर, कार्यकारी अभियंता, महावितरण, भोसरी विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT