पिंपरी-चिंचवड

भाजप आमदाराला कोरोना; फडणवीस व शरद पवारांच्या बैठकीला होते हजर!

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : पहेलवान आमदार अशी ओळख असलेले भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. सोमवारी सकाळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. चिंचवड- थेरगाव येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वायसीएम रुग्णालयात भेट दिली होती. त्या दिवशी आमदार लांडगे यांनी वायसीएममधील कोवीड वॉर्डची पाहणी केली होती. तेव्हापासून त्यांना कणकण जाणवत होती. अखेर रविवारी त्यांच्या घशातील द्रवाचे नुमने (स्वॅब) तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल आज आला. 

आमदार लांडगे यांच्याकडे पक्षाचे शहराध्यक्षपद असल्यामुळे अनेकांशी त्यांचा संपर्क येत असतो. गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांनी वायसीएम रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला होता. सुमारे सव्वातास ते रुग्णालयात होते. त्यांच्या समवेत आमदार लांडगे यांच्यासह भाजपचे माजी अध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारीही होते. सुमारे पाऊणतास आढावा बैठक सुरू होती. त्यानंतर फडणवीस यांच्यासह आमदार लांडगे व अन्य पदाधिकाऱ्यांनी वायसीएम बाह्यरूग्ण विभागाला भेट दिली होती. त्याच दिवशी लांगडे यांनी कोविड वॉर्डचीही पाहणी केली होती, अशी माहिती सुत्रांनी दिली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आमदार लांडगे आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यात आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. त्यापूर्ची दोन दिवस अगोदरही आमदार लांडगे महापालिकेत आले होते. त्यावेळी त्यांनी आयुक्त व अन्य अधिकारी, पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला होता. शिवाय, आमदार लांडगे यांच्या भोसरी येथील संपर्क कार्यालयात अनेक जण कामानिमित्त येत असतात. त्यामुळे आमदारांना संसर्ग कसा झाला? हे सांगणे कठीण आहे. मात्र, वायसीएमला भेट दिली तेव्हापासून त्यांना कणकण जाणवत होती, अखेर रविवारी तपासणी केल्यानंतर सोमवारी अहवाल पॉझिटीव्ह आला. असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नगरसेवकांनाही बाधा 

यापूर्वी माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक असलेल्या नेत्यालाही संसर्ग झाला आहे. ही व्यक्ती आमदार महेश लांडगे यांची कट्टर विरोधक आहे. हा नेता सुद्धा भोसरी विधानसभा मतदारसंघातीलच आहे. विशेष म्हणजे दोघांवरही चिंचवड- थेरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, चिंचवड विधानसभा मतदार संघातील एका नगरसेविकेसह त्यांच्या माजी नगरसेवक पतीलाही संसर्ग झालेला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

आजचे राशिभविष्य - 15 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT