भोसरी - भोसरी ग्रामस्थांद्वारे शेकडो वर्षांची परंपरा जपत याही वर्षी पाडव्याच्या दिवशी भैरवनाथ मंदिरात घेतलेल्या बैठकीत वडाच्या पानाच्या विड्याद्वारे ऋतु आणि वातावरणाच्या अंदाजाचे पंचांग सांगण्यात आले. या बैठकीत गाव जत्रेचेही नियोजन करण्यात आले. शहरीकरणातही भोसरीकरांनी गावची परंपरा जपली आहे.
यावेळी माझी ज्येष्ठ आमदार ज्ञानेश्वर लांडगे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक वसंत लोंढे, नितीन लांडगे, अजित गव्हाणे, जालिंदर शिंदे, पंडीत गवळी, सागर गवळी, महादेव गव्हाणे, पीकृष्ण धावडे आदिंची पाडव्याच्या ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी भोसरी उत्सव समितीचे उत्सवप्रमुख श्यामराव फुगे, भानुदास फुगे, शेखर लांडगे, मदन गव्हाणे, गणपत गव्हाणे, भानुदास लांडगे, सुदाम माने, राजाराम महाराज फुगे, अॅड. राहुल गवळी, अॅड. अमर लांडगे, विलास फुगे, किशोर गव्हाणे, अनिल फुगे, नारायण गव्हाणे आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
पाडव्याच्या आदल्या दिवशी वडाच्या पानांमध्ये ज्वारी, बाजरी, साळी आदी धान्य ठेवून त्याला मराठी महिन्यांची बारा नावे दिली जातात. भैरवनाथ मंदिरात झालेल्या बैठकीत प्रत्येक विडा उघडून गावात पडणाऱ्या पावसाचा अंदाज गावच्या ब्राह्मणाद्वारे सांगितला जातो. यावेळी गावचे ब्राह्मण सुधाकर तिखे यांनी प्रत्येक विडा उलगडून पंचांग सांगितले.
२६ व २७ एप्रिल रोजी भोसरी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाविषयी निर्णय घेण्यात आला. अगोदरच्या वर्षाच्या जत्रेचा जमाखर्च मांडण्यात आला आणि जत्रेच्या जबाबदाऱ्याही ग्रामस्थांमध्ये वाटण्जायात आल्या. त्यामुळे गावची ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत अशीच जतन होत जपली जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
किती वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे हे गावकऱ्यांना सांगता येत नाही, मात्र ही परंपरा शेकडो वर्षापासून चालत आल्याचे ग्रामस्थ अभिमानाने सांगतात. या सभेत भोसरीतील ज्येष्ठ नागरिकांबरोबर तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे गावची ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत अशीच जतन होत जपली जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
पाडव्याच्या दिवशी सकाळी विठ्ठल मंदिरात गावच्या विठ्ठल-रुक्मिणी भजीनी मंडळाद्वारे भजन सादर केले जाते.
भैरवनाथाचा गाभारा महिलांसाठी खुला
भोसरीतील भैरवनाथ मंदिरात महिलांना यापूर्वी प्रवेश नव्हता पाडव्याच्या दिवशी भैरवनाथ मंदिरात झालेल्या बैठकीत माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांनी भैरवनाथ मंदिरातील गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याचा ठराव मांडला. या ठरावास ग्रामस्थांनी एकमताने सहमती दिली.
महिलांमधून आनंद व्यक्त
भोसरीतील भैरवनाथ मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास मान्यता मिळाल्याने भोसरीतील महिलांनी आनंद व्यक्त केला आहे. भोसरी ग्रामस्थांनी गाभाऱ्यातील महिलांचा प्रवेशास संमती देत भोसरीकरांनी आधुनिक विचारसरणीचे दर्शन घडविले असल्याचे मत लता शिवाजी फुगे, सीमा नितीन टकले आदी महिलांसह इतर महिलांनी व्यक्त केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.