BSNL sakal
पिंपरी-चिंचवड

‘बीएसएनएल’ सेवेवर ग्राहक संतापले!

‘वारंवार केबल तुटण्याचे प्रकार घडतात. अत्यंत खराब सेवा दिली जाते. वीज पुरवठा खंडित झाला की, सेवा ठप्प होते.

सकाळ वृत्तसेवा

‘वारंवार केबल तुटण्याचे प्रकार घडतात. अत्यंत खराब सेवा दिली जाते. वीज पुरवठा खंडित झाला की, सेवा ठप्प होते.

पिंपरी - ‘वारंवार केबल तुटण्याचे (Cable Cutting) प्रकार घडतात. अत्यंत खराब सेवा (Bad Service) दिली जाते. वीज पुरवठा (Electric Supply) खंडित झाला की, सेवा ठप्प होते. अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी (Complaint) करूनही दुर्लक्ष (Neglect) केले जाते. सेवा देणारे व्हेंडर म्हणतात, ‘आमच्या हातात काही नाही.’ दर महिन्याला येणाऱ्या बिलाचा आकडा एकच असतो. बिल भरण्यासाठी जरा विलंब झाला. की, त्वरित कनेक्शन बंद केले जाते. माझा फोन नंबर ०२०- २७६५०५४१ हा असून तक्रार नंबर १०५८३३२८५६ हा आहे. मात्र, अधिकारी त्याची दखल घेत नाहीत’, असा त्रागा प्राधिकरणातील आनंद पानसे यांनी बीएसएनएल (भारत संचार निगम लिमिटेड) सेवेबाबत व्यक्त केला आहे.

बीएसएनएल सेवा घेणारे शहरात सुमारे ११ हजार नागरिक आहेत. प्राधिकरणामध्ये आजही बऱ्याच नागरिकांनी सरकारी बीएसएनएल ब्रॉड-बॅण्डच्या जोडण्या घेतलेल्या आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, काही महिने सेवा सुरळीत चालली की, नंतर अडचणी उद्‌भवतात. दररोज एक तास, तर कधी दोन तास इंटरनेट कनेक्शन बंद होते. ‘बीएसएनएल’कडून कधी केबल तुटते तर, कधी आकुर्डी, चिंचवड, भोसरी एक्स्चेंजकडून बंद असते. या भागातील सर्व्हर कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या आवारामध्ये बसवलेला आहे. त्याला बॅकअप खूप कमी आहे. त्यामुळे, बऱ्‍याच वेळा अडचणी येतात. अधिकारी कोणीही जबाबदारी घेत नाही. आकुर्डी कार्यालयामधील अधिकारीही जबाबदारी झटकून रिकामे होतात. तक्रार करण्यास कार्यालयात गेल्यास अधिकारी उपलब्ध नसतात. चिंचवड मुख्य कार्यालयामधील अधिकाऱ्यांनी अडचणींबाबत बैठक घेतली, मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. दोन दिवसांपूर्वी दुपारी बारा वाजता बंद पडलेला सर्व्हर दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता सुरू झाला. कोणताही अधिकारी लक्ष घालत नाही. बरेच नागरिक ऑनलाइन काम करतात, त्यामुळे त्यांची पंचाईत होते.

पूर्वी मुलांच्या ऑनलाइन शाळा होत्या. त्यामुळे वारंवार नेट बंद पडत होते. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात मुलांचे शालेय नुकसान झाले आहे. कोणतीही सवलत बीएसएनएलकडून नाही. ग्राहकांच्या समस्येचे निराकरण केले जात नाही. तक्रारींची सुनावणी घेतली जात नसल्याच्या तक्रारी नीलेश वायकुळे यांनी ‘सकाळ’ प्रतिनिधीसमोर मांडल्या.

ऑप्टिक फायबर केबलची अडचण वारंवार उद्‌भवत आहे. ती व्हेंडरकडून सोडविली जात नाही. ‘बीएसएनएल’वर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे, दोन दिवस सेवा ठप्प राहिली. गेले पंधरा दिवस ते एक महिन्यांपासून जास्त समस्या जाणवत आहे. केवळ तक्रार नोंदवून घेतली जाते. त्यापुढे काहीही होत नाही.

- विनायक श्रोत्री, ग्राहक, प्राधिकरण

‘बीएसएनएल’ जोड हे लिनिअरमध्ये असून रिंगमध्ये नाहीत. केबल तुटली की, जोडण्यास एक ते दोन तासांचा कालावधी दुरुस्ती करण्यासाठी लागतो. त्यामुळे, सेवा डाउन राहते. महापालिका खोदकामे सातत्याने करत आहे. रस्ते तसेच पाणीपुरवठा व ड्रेनेजची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. महापालिकेसोबत पत्रव्यवहार केला आहे. ठेकेदार सांगतात की, आम्हाला काम दिले तेवढे आम्ही करणार. वाकड, भोसरी, पिंपरी, चिंचवड, चिंचवडगावात सर्वांनाच समस्या जाणवत आहेत.

- सुनील मांझी, बीएसएनएल ऑफिस, इनचार्ज, चिंचवड

नोकरदारांवर विपरीत परिणाम

प्राधिकरणात एकाच परिसरात ४० जोड आहेत, त्यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ असणाऱ्या नोकरदारांच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे, सेवा बंद करण्याची वेळ आली आहे. ‘बीएसएनएल’च्या ग्राहकांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. त्यावर तक्रारींचा भडिमार होतो. मात्र, त्या ग्रुपमध्ये ‘बीएसएनएल’चे अधिकारी असूनही दखल घेत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT