RTE Admission News sakal
पिंपरी-चिंचवड

महसुल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरटीईच्या पालकांना मिळेना दाखले

महसुल कर्मचाऱ्यांच्या दोन आठवडे चाललेल्या संपाचा फटका आरटीईच्या पालकांना

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महसुल कर्मचाऱ्यांच्या दोन आठवडे चाललेल्या संपाया फटका आरटीईच्या पालकांना बसला आहे. या प्रवेशांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उत्पन्नाचे दाखले, भाडे करार आणि जातीचे दाखले मिळवण्यासाठी अनेक पालकांना धावपळ करावी लागत आहे. यामुळे लॉटरीमध्ये प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशही अद्याप अधांतरीच आहेत. दरम्यान २९ तारखेपर्यत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

मार्च महिन्याच्या ३० तारखेला आरटीई प्रवेशांसाठी लॉटरी काढण्यात आली. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना‘एसएमएस’द्वारे कळवण्यात आले आहे. मात्र, या पालकांपुढे आता कागदपत्रे मिळवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अनेक पालकांचे लॉकडाउनच्या काळात उत्पन्न कमी झाले आहे. त्यांच्याकडे पूर्वीच्या उत्पन्नाचे दाखले आहेत. यामुळे जुन्या दाखल्यांच्या आधारे अर्ज करावे लागले आहेत.

नवे दाखले मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी येत असल्याचे पालकांकडून सांगितले जात आहे. महसुल कर्मचाऱ्यांच्या संपावर असल्यामुळे जातीचा दाखला मिळवण्यासाठी पालकांना सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत असून, हे दाखलेही उपलब्ध होत नसल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे. आता संप मिटला आहे, पण कामकाज तेवढ्या वेगाने सुरू झालेले नसल्यामुळे पालकांना अडचणी येत आहेत.

‘‘आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे मिळण्यास अडथळे येत आहेत. अनेकांना जुन्या कागदपत्रांच्या आधारे अर्ज करावे लागले आहेत. प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करणे अपेक्षित आहे. प्रवेशांची पहिली फेरी जलदगतीने झाली, तर प्रतीक्षायादीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांसंदर्भातही स्पष्टता येईल.’’

-हेमंत मोरे, अध्यक्ष आरटीई पालक संघ

‘‘दररोज १५० उत्पन्नाचे दाखल्यांची आवक होत आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे मिळण्यास अडचण येऊ नये, म्हणून दररोज दाखले देण्यात येत आहेत. ’’

-प्रवीण ढमाले, नायब तहसिलदार आकुर्डी तहसिलदार कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT