Chakan MIDC Vehicle Parking Sakal
पिंपरी-चिंचवड

चाकण एमआयडीसीतील वाहनतळ उद्घाटनाच्या प्रतिक्षेत

चाकण एमआयडीसीतील काम पुर्ण झालेले ट्रक टर्मिनल, जवळपास दोन महीन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे.

गणेश बोरुडे

चाकण एमआयडीसीतील काम पुर्ण झालेले ट्रक टर्मिनल,जवळपास दोन महीन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे.

तळेगाव स्टेशन - चाकण एमआयडीसीतील काम पुर्ण झालेले ट्रक टर्मिनल, जवळपास दोन महीन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. परिणामी इशारा फलक लावूनही अवजड वाहने सर्रास एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांवर पार्क केली जात असल्यामुळे दिवसेंदिवस अपघात अन् वाहतूक कोंडीत वाढ होत आहे.

अॅटोमोबाईल इंडस्ट्रिअल हब म्हणून जगभर परिचित चाकण एमआयडीसीत दिवसाकाठी शेकडो वाहनांचे दळणवळण चालते. पार्किंगची सोय नसल्यामुळे आजपावेतो कच्च्या-तयार मालाची ने आण करणारी अनेक अवजड वाहने भर रस्त्यावर अथवा रस्त्यालगत उभी केली जातात.तळेगाव-चाकण महामार्ग तसेच एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांवर कित्येक दिवस अवजड वाहने उभी करुन ठेवली जातात. वाहन पार्किंगला स्वतंत्र आणि सुरक्षित जागा नसल्यामुळे अपघात, वाहतुुक कोंडी आणि चालकांची कुचंबणा होते. ही बाब लक्षात घेऊन एमआयडीसी प्रशासनाने चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक-२ मधील एचपी चौकाच्या पश्चिमेकडील खालूंब्रे शिवारात, कस्तुरबा महिला उद्योजक सोसायटीच्या बाजूला, सर्व्हे नंबर एएम-२/२ मधील सहा एकराच्या राखीव भुखंडांवर सुसज्ज अशा वाहनतळाचे काम तीन वर्षांपूर्वी हाती घेतले होते. लाॅकडाउनमुळे जवळपास वर्षभर रखडलेले हे काम, साधारणत: दोन महीन्यांपुर्वीच पुर्ण झाले आहे.

वाहनांचे पार्किंग लॉट आखण्यात आले असून, पथदिवे देखील बसवण्यात आले आहेत. चालक सेवा केंद्राच्या धर्तीवर सुरक्षारक्षक, गॅरेज, उपहारगृह, स्वच्छतागृह आदी सुविधा इथे चालकांना मिळणार आहेत. वाहनतळाचा वापर करण्याबाबत आणि अवजड वाहने रस्त्यावर लावल्यास कारवाईबाबत इशारा फलकही ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र, वाहनतळ कंत्राटी पद्धतीवर चालवण्यास देण्याची निविदा प्रक्रिया लांबल्यामुळे हा वाहनतळ गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अद्याप उद्घाटनाच्या प्रतिक्षेतच आहे.त्यामुळे सध्या तरी हा वाहनतळ वापराविना पडून आहे. शासकीय सोपस्कार पूर्ण करून वाहनतळ लवकरात लवकर वापरासाठी खुला करण्याची मागणी आहे.

चाकण एमआयडीसीचा वाहनतळ चालवण्यासाठी एमआयडीसीकडून सुरुवातीस दोन वेळा मागविण्यात आलेल्या निविदांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. तिस-यांदा मागविण्यात आलेली, प्राप्त निविदा मुख्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. महिनाभरात सदर वाहनतळ कार्यान्वित होईल.

- संजय कोतवाड (कार्यकारी अभियंता,चाकण एमआयडीसी)

दृष्टीक्षेपात चाकण एमआयडीसी ट्रक टर्मिनल

  • वाहनतळाचे एकूण क्षेत्र : २५,००० चौरस मीटर

  • कामाचा खर्च : ३५५.९७ लक्ष

  • सुविधा : शौचालय,उपहारगृह,४-दुकाने

  • किमान क्षमता : १०३ वाहने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT