दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाला आणखी एक महिनाही झाला नाही. आम्ही आणखी दुखा:तून सावरलो नाही.
पिंपरी - दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाला आणखी एक महिनाही झाला नाही. आम्ही आणखी दुखा:तून सावरलो नाही. त्यामुळे चिंचवड विधानसभेच्या पोट निवडणुकीतील उमेदवारीबाबत आणखी काहीही ठरलेले नाही, अशी माहिती चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रभारी व आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी बुधावरी (ता. २५) पत्रकारांशी पिंपरीत बोलताना दिली.
शंकर जगताप म्हणाले की, दिवंगत जगताप आजारी असतानाही पक्षनिष्ठच होते. आजारी असताना त्यांनी राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीला जावून दाखविले आहे. त्यांनी दाखविलेली निष्ठा जपण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
आम्ही त्या दुख:त असल्यामुळे उमेदवारीबाबत कुटुंबियात राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही. आम्ही कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात जात नाही. आज पक्षाने बोलविले व घरातील कुटुंबियाने असावे असे सांगितल्यामुळे आजच्या बैठकीला आम्ही आलो होतो.
जगताप कुटुंबियांनाच उमेदवारी द्यावी, असे आमचे म्हणने नाही. आम्ही पक्षाच्या पाठीमागे आहोत. पक्ष ज्यांना उमेदवारी देईल, त्यांच्या पाठीशी आम्ही राहू. जगताप कुटुंबियांनी पक्षनिष्ठा सहा महिन्यांपुर्वी दाखविली आहे.
- शंकर जगताप, निवडणूक प्रभारी, चिंचवड विधानसभा मतदारसंघ.
जगताप कुटुंबिय गेली ४० वर्षे राजकारणात आहे. जगताप कुटुंबिय त्यांच्यात चर्चा करुन एक नाव द्यायला सक्षम आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जगताप कुटुंबियातीलच उमेदवार असणार आहे. मात्र; केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड उमेदवारी जाहिर करेल.
- एकनाथ पवार, प्रदेश प्रवक्ते, भाजपा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.