corona patient zero sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : खासगी रुग्णालयांत कोरोना रुग्ण शून्य

मार्च २०२१ मध्ये सर्व रुग्णालये होती ‘हाउसफूल्ल’

, सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गेल्या वर्षीचा मार्च व एप्रिल महिना सर्वांनाच घाम फोडणारा होता. कोरोना संसर्गचे प्रमाण वाढलेले होते. दररोज सरासरी एक हजारपेक्षा अधिक जण पॉझिटिव्ह आढळत होते. मृत्यूचे प्रमाणही अधिक होते. दिवसाला किमान दहापेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू होत होता. महापालिकेची सर्व आठही रुग्णालयांसह जम्बो कोविड आणि खासगी रुग्णालयेही फुल्ल होती. रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नव्हते अशी स्थिती होते. या वर्षी मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या रुग्णालयांत रविवारी (ता. २७) केवळ दोन रुग्ण होते. खासगी १२४ रुग्णालयांत एकही रुग्ण नव्हता.

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी महापालिकेची आठ रुग्णालये, नेहरूनगर आणि ऑटो क्लस्टर येथील जम्बो कोविड रुग्णालयांत सोय होती. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडही उपलब्ध होते. मात्र, मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून रुग्ण वाढायला सुरुवात झाली होती. बेड मिळत नव्हते. खासगी रुग्णालयांमध्येही हीच स्थिती होती. आता सर्वच खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर सुविधा असलेले व नसलेले सर्वच बेड रिकामे आहेत. कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण खासगी रुग्णालयात नाही.

रुग्ण व नातेवाईकांचे अनुभव

माझ्या भावाला काळेवाडी परिसरातील खासगी रुग्णालयात गेल्या वर्षी दाखल केले होते. रुग्णाला भेटू दिले जात नव्हते. त्यामुळे भीती वाटत होती. पंधरा दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. साडेचार लाख रुपये बिल झाले होते. विनंती करूनही त्यांनी कमी केले नाही. सर्व रक्कम भरावीच लागली, असे चाळिशीतील तरुणाने सांगितले. महापालिका सेवेतील महिला कर्मचारी म्हणाली, ‘‘माझे मेहुणे मोशीतील खासगी रुग्णालयात दाखल होते. आठव्या दिवशी त्यांचा मेसेज आला की, ‘सीटीस्कोअर रिपोर्ट १६ आला आहे.’ आम्ही रुग्णालयात गेलो. तेथून डिस्चार्ज घेतला आणि वायसीएममध्ये दाखल केले.

तिसऱ्या दिवशी सीटीस्कोअर नॉर्मल असल्याचे कळाले. सातव्या दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळाला.’’ खासगी कंपनीतील कामगार शुभम कुलकर्णी म्हणाला, ‘‘गेल्या वर्षी मला ताप आला. तपासणी केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. म्हाळुंगे येथील कोविड केअर सेंटरला दाखल झालो. त्यानंतर मनात शंका नको म्हणून मामा व आजीची तपासणी केली. त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पण, लक्षणे काहीच नव्हती. त्यांच्यावरही कोविड केअर सेंटरमध्येच उपचार केले. आता आम्ही तिघेही ठणठणीत आहोत. पण, कोरोनाविषयीची भीती आजही मनात आहे.’’

खासगी रुग्णालये...

  • एकूण रुग्णालये : १२४

  • ऑक्सिजनविरहित बेड : १७१६

  • आयसीयू बेड : ६८५

  • व्हेंटिलेटरयुक्त बेड : ३००

  • ऑक्सिजन सुविधांयुक्त बेड : २२७८

  • सद्यःस्थितीत रुग्ण

  • खासगी रुग्णालयांत : शून्य

  • महापालिका रुग्णालयांत : २

  • गृहविलगीकरणात : ७७

  • एकूण रुग्ण : ७९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT