पिंपरी : केंद्र सरकारकडून अद्याप सूचना आली नसल्याचा दावा, यंत्रणेची तयारी नसल्याचे स्पष्ट चित्र, कोविन ॲपमुळे निर्माण झालेले प्रश्न आणि अॅपवर नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी... अशा गोंधळानंतर शहरात बुधवारी (ता. १६) दुपारी पावणेदोनला ‘कोर्बोव्हॅक्स’ लसीकरणाला सुरुवात झाली. लशीसाठीची दीर्घकाळ प्रतीक्षा आणि सहन करावा लागलेला मनस्ताप यामुळे बारा ते चौदा वयोगटातील लाभार्थ्यांचा रागाचा पारा चढला होता. दिवसभरात महापालिकेच्या तीन लसीकरण केंद्रांद्वारे ६० मुलांना लस देण्यात आली.
प्रभाकर कुटे हॉस्पिटल आकुर्डी, नवीन थेरगाव रूग्णालय आणि नवीन भोसरी रूग्णालय येथे दिवसभर प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पहिल्या दिवशी या मुलांना कोर्बोव्हॅक्स लस देण्यात येणार होती. त्यासाठी तीन रुग्णालयांत ६०० डोस उपलब्ध होते. शासनाच्या निकषानुसार मुलांच्या लसीकरणाला बुधवारपासून सुरवात झाली. मात्र, त्यासाठी दुपारी उशिरापर्यंत शासनाकडून कोणत्याही सूचना मिळाल्या नव्हत्या. आरोग्य प्रशासन ‘थांबा आणि पहा’ या भूमिकेमध्ये होते. यंत्रणांची पूर्ण तयारी नसल्याने लसीकरण आणि नोंदणी होणार नसल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. त्यानंतर काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडले. तिन्ही रुग्णालयामध्ये गोंधळाची परिस्थिती होती.
नियोजनाअभावी विद्यार्थ्यांना फटका
प्रभाकर कुटे हॉस्पिटल आकुर्डी येथे सकाळी साडेदहा वाजेपर्यंत अॅप उपलब्ध नव्हते. कोविन ॲपमध्ये ‘१२ ते १४ ’ वयोगटातील लाभार्थ्यांची नोंद दिसत नव्हती. त्यामुळे मुलांना लस देता येत नव्हती. नवीन थेरगाव हॉस्पिटलमध्ये फक्त १६ जणांना लस देण्यात आली. पण कोविन पोर्टल सुरू होत नव्हते. म्हणून सकाळी लवकर आलेल्या मुलांनाच लस देण्यात आली. त्यांना उद्या सकाळी परत रजिस्ट्रेशनसाठी बोलावले आहे. त्यांचे आधारकार्ड, मोबाईल नंबर तसेच जन्मतारीख याची नोंद घेण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या अॅपमध्ये नोंदणी करताना अडचणींचा सामना प्रशासनाला करावा लागला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.