Dhol Tasha sakal
पिंपरी-चिंचवड

Dhol Tasha : परराज्यातील तरुणांनाही ढोल-ताशा वादनाची ‘क्रेझ’

गेल्या काही वर्षांपासून ढोल ताशा पथकांचे वादन हे गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरत आहे. सर्व वयोगटांतील नागरिकांबरोबरच अगदी कलाकारदेखील हौसेने ढोल- ताशा पथकांत वादन करण्यासाठी येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - गेल्या काही वर्षांपासून ढोल ताशा पथकांचे वादन हे गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरत आहे. सर्व वयोगटांतील नागरिकांबरोबरच अगदी कलाकारदेखील हौसेने ढोल- ताशा पथकांत वादन करण्यासाठी येत आहेत. यामुळे वादनाची ‘क्रेझ’ तरुणांमध्ये निर्माण नाही झाली तर नवलच. पण आता परराज्यातील तरुणही ढोल ताशा वादनाकडे वळत आहेत. यामध्ये दक्षिण भारतातील राज्यांबरोबरच, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातून येणाऱ्या तरुणांची संख्या जास्त आहे.

सभासद नोंदणीला प्रतिसाद

गणेशोत्सवाला अवघ्या महिन्याचा अवधी शिल्लक आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्या शहरातील ढोल ताशा पथकांचा सराव सुरू झाला आहे. अनेक ढोल ताशा पथकांची सभासद नोंदणी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. यावर्षी सभासद नोंदणीसाठी मोठा प्रतिसाद मिळाला असून, शहरातील प्रत्येक पथकामध्ये सरासरी १०० ते १५० नवीन वादकांची नोंद झाली आहे. यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुणी, आयटी अभियंता व डॉक्टर यांच्यासोबत परराज्यातील तरुणांचाही समावेश आहे.

तणावमुक्तीसाठी वादन

कार्यालयीन कामकाजामध्ये दिवसाचे दहा ते बरा तास घालविल्यानंतर खासगी कर्मचारी सायंकाळी वादनाच्या सरावाला हजेरी लावत आहे. विद्यार्थीही आपल्या शाळा- महाविद्यालयांच्या वेळा व अभ्यास सांभाळून सराव करत असतात.

या सरावामुळे दैनंदिनी कामकाजातील तणाव घालविण्यासाठी मदत होत असून, विद्यार्थ्यांचा स्‍क्रीन टाइम कमी होत आहे. ढोल ताशा वादनाचा सराव गणेशोत्सवाच्या दीड ते दोन महिने आधीपासून सुरु होतो. वादक मात्र सराव केव्हा सुरू होणार, याची दरवर्षी वाट पाहत असतात, असे स्वराज्य ढोलताशा पथकाचे प्रमुख राहुल दातीर यांनी सांगितले.

गणेशोत्सव हा देशभरात साजरा केला जातो. परंतु पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे आकर्षण हे देश विदेशातील नागरिकांना आहे. ढोल ताशा पथकांचे वादन हे गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य असते. हे वातावरण अनुभवण्यासाठी खास बाहेर गावाहून पुण्यात येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पण ढोल ताशा वादनाच्या माध्यमातून परराज्यातील तरुण सार्वजनिक गणेशोत्सवात प्रत्यक्ष सहभाग नोंदविताना दिसत आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये शिकण्यासाठी व नोकरीसाठी परराज्यातून येणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात केले जाणारे ढोल ताशांचे वादन पाहून अनेक जण स्वतःहून पथकांमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत.

- निखिल राणे, समन्वयक, आवर्तन ढोल ताशा पथक

गणेशोत्सवात सहभागी होण्याची इच्छा खूप आधीपासून होती. येथे नोकरीसाठी आल्यावर सहकाऱ्यांमुळे ढोल पथकांमध्ये सहभागी होण्याची मला संधी मिळाली. मी दक्षिण भारतीय असल्याने मला मराठी येत नाही पण ढोल ताशा शिकण्यासाठी भाषेची अडचण केव्हाच आली नाही. यावर्षी पहिल्यांदाच मी गणेशोत्सवात वादन करण्यासाठी मी उत्सुक आहे.

- प्रसन्ना, मेकॅनिकल इंजिनिअर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT