crime news Company owners arrested for fake loan provider fraud wakad sakal
पिंपरी-चिंचवड

कोटींचे कर्ज देण्याच्या बहाण्याने लोकांना लुटणाऱ्या कंपनी चालकांना अटक

१ कोटी रुपयांपासून ते शंभर कोटी रुपयांपर्यंत कर्ज देणाच्या बहाण्याने लोकांकडून लाखों रुपयांची लूट

सकाळ वृत्तसेवा

वाकड : १ कोटी रुपयांपासून ते शंभर कोटी रुपयांपर्यंत कर्ज देणाच्या बहाण्याने लोकांकडून लाखों रुपयांची लूट करणाऱ्या जलाराम एन्टरप्राईजेस लिमिटेड या बोगस कर्ज कंपनी चालकांना हिंजवडी पोलीसांनी अटक केली. कंपनीच्या ऑफिसवर छापा मारून १३ कॉम्पुटर, ७ मोबाईल, दोन कर्ज प्रकरण संबंधी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी श्रीराम प्रल्हाद पिंगळे (वय. ४३, रा. करिष्मा सोसायटी कोथरुड पुणे) यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार महिला मॅनेजर राधीका यतीश आंबेकर, (रा. २/३२, राधा नगर को ऑप हौ सोसायटी, कल्याण पश्चिम मुंबई), संदीप रामचंद्र समुद्रे (वय. ३७, रा. मेट्रो रेसिडेन्सी कल्याण पुर्व ठाणे), जयजित रामसनेही गुप्ता (वय..३६ रा. मोठागाव, शिवशांती चाळ, डोंबीवली पश्चिम कल्याण) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी फिर्यादी यांचा मित्र जयेश हरिचंद्र पाटील यांनी फेसबूकवर।जलाराम इंटरप्रायजेस प्रायव्हेट फंड या कंपनीची व्यवसायासाठी एक कोटीपासून कर्ज अशी जाहिरात पाहिली कंपनीला संपर्क साधला असता बी-१००८ तिर्थ टेक्नोस्पेस बाणेर या ठिकाणी त्यांना बोलावण्यात आले त्याठिकाणी जावून फिर्यादी व त्यांचे मित्र यांनी लोनबाबत चौकशी केली असता १ कोटीसाठी ५ लाख रुपये कॅश याप्रमाणे सिक्युरीटी डिपॉझीट दयावे लागेल असे सांगुन ४५ दिवसात लोन दिले जाईल अशी माहिती महिला मॅनेजर राधीका आंबेकर हीने सांगितली. त्यावेळी फिर्यादी यांना ही कपंनी फसवणुक करण्याची शक्यता असल्याबाबत संशय आल्याने त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली.

सहायक निरीक्षक राम गोमारे यांनी त्या कंपनीला गिऱ्हाईक म्हणुन फोन करून माहिती घेतली असता ती माहिती अपुर्ण व विश्वासपात्र नसल्याचे समजले त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राम गोमारे, हवालदार योगेश शिंदे, कैलास केगले, कारभारी पालवे, रितेश कोळी, महिला पोलिस ढोणे यांच्या पथकाने बाणेर येथील ऑफिस गाठले. महिला मॅनेजरला विचारपुस केली असता कंपनीचे रजिस्ट्रेशन नसल्याचे व कंपनीने आरबीआयच्या गाईडलाईनप्रमाणे परवानगी नोंदणी नसल्याची खात्री झाली. तसेच ७ महिला यांना अपॉईंटमेंट लेटर न देता नोकरीस ठेवल्याचे निष्पन्न झाल्याने मॅनेजर राधीका आंबेकर हीला अटक केली.

आरोपी महिलेलाकडे केलेल्या तपासात तिचे साथीदार संदीप समुद्रे ही कंपनी चालवित होता व प्रोप्रायटर म्हणून जयजित गुप्ता याचे नाव असल्याचे समजल्याने संदीप समुद्रे व जयजित रामसनेही गुप्ता यांना फाटकमोठागाव शिवशांती चाळ रुम नं. २ डोंबीवली पश्चिम कल्याण मुंबई येथून २४ जुलै रोजी अटक करण्यात आली. या दोघांनी अशाच प्रकारे नवी मुंबई, वाशी सेक्टर ३० येथे या यापूर्वी कंपनीची शाखा सुरु करुन तेथेही बऱ्याच लोकांची फसवणुक केल्याची माहिती स्थानिक पोलीसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT