Illegal Hoarding Crime sakal
पिंपरी-चिंचवड

Illegal Hoarding : अनधिकृत होर्डिंगवर हातोडा! मोशी परिसरात पहिल्याच दिवशी चार ठिकाणी कारवाई

पिंपरी चिंचवड महापालिकेच्‍यावतीने शहरातील अनधिकृत होर्डिंग हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. सोमवारी (ता. २०) कारवाईच्‍या पहिल्‍याच दिवशी केवळ एकाच विभागात सुरवात करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्‍यावतीने शहरातील अनधिकृत होर्डिंग हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. सोमवारी (ता. २०) कारवाईच्‍या पहिल्‍याच दिवशी केवळ एकाच विभागात सुरवात करण्यात आली. ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या मोशी भागात सायंकाळी पाचपर्यंत चार मोठे होर्डिंग हटविण्यात आले आहेत. या कारवाई बरोबरच शहरातील इतरही भागातील होर्डिंग हटविण्याची कारवाई लवकरच केली जाणार असल्‍याची माहिती महापालिकेने दिली.

मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्‍या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्‍यातील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. ही घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे देखील होर्डिंग कोसळण्याची घटना घडली. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने अनधिकृत धोकादायक होर्डिंगवरील कारवाईची गती वाढवली. नुकतीच आयुक्‍त शेखर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन होर्डिंगवर कारवाई करणार असल्‍याची माहिती दिली होती. त्‍यानुसार शहरात सोमवारी (ता. २०) सकाळपासूनच कारवाईला सुरवात करण्यात आली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्‍या ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या मोशी परिसरात कारवाईला सुरवात करण्यात आली. चारपर्यंत तीन मोठे होर्डिंग हटविण्यात आले. मोशी येथील भारतमाता चौक, जुना जकात नाका, सस्‍तेनगर, पिंगळे खानावळ परिसरात कारवाई करण्यात आली. यामध्ये ३० फूट उंच, २० फूट रुंदीचे दोन, ४० फूट उंच, २० फूट रुंदीचे एक, १५ फूट उंच आणि २० फूट रुंदीचे एक होर्डिंग हटविण्याची कारवाई पाचपर्यंत करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरातील धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर कारवाईला सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. २०) ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मोशी भागात कारवाईला सुरवात करण्यात आली. एकूण चार होर्डिंग काढण्यात आले आहेत. शहरातील उर्वरित सर्व अनधिकृत होर्डिंग तीन दिवसांत काढले जाणार आहेत.

- संदीप खोत, उपायुक्‍त, आकाशचिन्‍ह व परवाना विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.

मोशी येथे कारवाईचा बडगा

  • भारतमाता चौक

  • जुना जकात नाका

  • सस्‍तेनगर

  • पिंगळे खानावळ परिसर

तीन दिवसात कारवाई करणार

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डिंगवरील कारवाईला मोशीपासून सुरवात करण्यात आली आहे. आयुक्‍तांच्‍या सूचनेनंतर अनधिकृत होर्डिंग हटविण्याची कारवाई वेगाने करण्यात येत आहे. शहरातील इतरही भागातील अनधिकृत होर्डिंग हटविण्याची कारवाई केली जाणार आहे. येत्‍या तीन दिवसांत शहरातील सर्वच अनधिकृत धोकादायक होर्डिंग हटविण्यात येणार असल्‍याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT