pcmc sakal
पिंपरी-चिंचवड

Unauthorized Schools : पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत शाळा वर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड शहरातील शाळांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शाळांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. चिंचवडमधील लिटील स्टार इंग्लिश मिडियम स्कूल आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या दोन अनधिकृत शाळांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सकाळ वारंवार पाठपुरावा केला होता. उर्वरित शाळावर गुन्हा कधी दाखल होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पहिल्या गुन्ह्यात ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलचे जे डीकोस्टा (रा. बंगलोर) आणि समीर गोरडे (रा. विमाननगर, पुणे) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दुस-या गुन्ह्यामध्ये लिटील स्टार इंग्लिश मिडियम स्कूलचे श्रेयकुमार (रा. चिंचवडेनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये विलास दयाराम पाटील (वय 51, रा. नवी सांगवी) यांनी सोमवारी (दि. 15) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2024 पासून आरोपींनी शासनाने ठरवून दिलेल्या कोणत्याही नियम व अटींची पूर्तता न करता लिटील स्टार इंग्लिश मिडियम स्कूल आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या शाळा सुरू ठेवल्या. तसेच शाळा अधिकृत असल्याचे पालकांना भासवून विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे शाळेत प्रवेश देत फी वसूल केली. विद्यार्थ्यांचे दाखले व इतर शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेऊन शासन, विद्यार्थी व पालक यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, शहरात कित्येक वर्षांपासून अनधिकृत शाळांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. शाळा हे कमी वेळेत मुबलक पैसा कमविण्याचे साधन बनले आहे. समाजातील विविध क्षेत्रातील लोकांनी मराठी, इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. या शाळा विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क वसुलीही करतात. परंतु; आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT