मुंढवा - महात्मा फुले चौकात सिग्नल सुरू होण्याआधीच झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे गेलेले वाहनचालक. sakal
पिंपरी-चिंचवड

कोंडीमुळे डांगे चौकाचा श्‍वास कोंडला; वाहनचालक त्रस्त

ग्रेडसेपरेटरचे काम संथगतीने; निमुळत्या रस्त्यांमुळे वाहतुकीचा बट्ट्याबोळ

सकाळ वृत्तसेवा

वाकड : एकीकडे अतिक्रमणांचा विळखा, तर दुसरीकडे संथगतीने सुरू असलेले ग्रेडसेपरेटरचे काम, यामुळे थेरगावातील डांगे चौक (Dange Chowk) कधी मोकळा श्‍वास घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रचंड रहदारी असलेल्या डांगे चौकातील चारपदरी ग्रेडसेपरेटरचे काम मे २०२१ पर्यंत पूर्ण होऊन, तो वाहतुकीसाठी खुला होणार होता. मात्र, काम रखडल्याने येथील वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. (Dange Chowk Encroachment congestion Driving distressed)

ग्रेडसेपरेटरच्या कामाचे १२ सप्टेंबर २०१९ रोजी भूमिपूजन झाले. २४ कोटी ७० लाख ७९ हजार १९७ रुपये खर्चाचे हे काम आजतागायत ७० टक्केच पूर्ण झाले आहे. १८ महिने मुदतीचे हे काम दोनवेळा झालेल्या लॉकडाउन आणि त्यानंतर कुशल कामगारांअभावी खोळंबले होते. मात्र, त्यानंतरही बीआरटी प्रशासनास योग्य गती साधता न आल्याने रस्ता वाहतुकीसाठी दोन महिने विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील वाहतूक समस्या गंभीर बनली आहे. त्यात पाऊस सुरू असल्याने निमुळत्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचून मोठे तळे होत असल्याने वाहनांचा वेग मंदावतो. दरम्यान, ग्रेडसेपरेटरमुळे डांगे चौक विस्तीर्ण होणार आहे. शिवाय, सिग्नल यंत्रणा नसल्याने प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. वाहनचालकांना विनाथांबा, विनाअडथळा इच्छितस्थळी पोचता येईल. त्यामुळे नको ती गर्दी टळणार आहे.

ग्रेडसेपरेटरच्या कामासाठी एकाच बाजूला अधिक जागा संपादित केल्याचा आरोप करीत येथील व्यापाऱ्यांनी सुरुवातीला या कामाला विरोध केला होता. मात्र, मनपा मंजूर रस्ते विकास योजनेत भूमकर वस्तीच्या बाजूला ४५ मीटर व डांगे चौकाकडून चिंचवडकडे जाताना ३४.५ मीटर रस्ता संपादित केला आहे. तसेच, मुख्य चौकातून मुंबई-बंगळूर महामार्गाला जोडणारा दुहेरी बीआरटी पूल गेला आहे. त्या पुलाच्या पिलरच्या फाउंडेशनची स्थिती यांचा समन्वय साधून पुलाला धोका होऊ नये, म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने तांत्रिक बाब तपासून हा ग्रेडसेपरेटर करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

पुलाऐवजी ग्रेडसेपरेटर

आयटी पार्क हिंजवडीकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक असल्याने डांगे चौक येथे उभा पूल बांधावा, त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. अखेर तांत्रिक बाबींमुळे येथे ग्रेडसेपरेटरच्या कामाला मंजुरी मिळाली. मात्र, हे काम रेंगाळल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेने युद्धपातळीवर काम पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दोनवेळा झालेल्या लॉकडाउनमुळे कामाला उशीर झाला. चौकात स्लॅब टाकण्याचे काम बाकी आहे, त्यासाठी बांधणी पूर्ण झाली आहे. त्यांनतर रस्त्याचे काँक्रिटीकरण होईल. ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करून ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.

- बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता, बीआरटीएस

याआधी महापालिकेने डांगे चौकातील रस्ता रुंदीकरण करून नंतर ग्रेड सेपरेटरचे काम करणे गरजेचे होते. मात्र, तसे न झाल्याने सध्या पादचाऱ्यांना १०० मीटर चालायला तब्बल दीड ते दोन तास लागतात. पदपाथ नाहीत. वाहनांच्या रांगा लागतात.

- व्यावसायिक

येथील वाहतूक समस्या बिकट झाली असून, वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. एखादा रुग्ण घेऊन जाणेही अवघड झाले आहे. महापालिकेने त्वरित काम पूर्ण करावे व वाहतूक पोलिसांनी दंडाऐवजी वाहतूक नियमनाकडे लक्ष दिल्यास नागरिकांची काही प्रमाणात सोय होईल.

- डॉ. विजय सुर्वे, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

IND vs AUS: रोहित, शुभमनची पर्थ कसोटीतून माघार; जसप्रीत बुमराह कर्णधार! जाणून घ्या Playing XI कशी असणार

SCROLL FOR NEXT