Pune Nashik Highway Road Sakal
पिंपरी-चिंचवड

पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण रखडल्याने विद्रूपीकरण

पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरणासाठी महापालिकेने बांधकामे पाडली. काही नागरिकांनी स्वतः काढून घेतली. मे महिन्यात ही कारवाई झाली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरणासाठी महापालिकेने बांधकामे पाडली. काही नागरिकांनी स्वतः काढून घेतली. मे महिन्यात ही कारवाई झाली.

पिंपरी - पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरणासाठी महापालिकेने बांधकामे पाडली. काही नागरिकांनी स्वतः काढून घेतली. मे महिन्यात ही कारवाई झाली. त्यास आता तीन महिने पूर्ण होत आहेत, मात्र, त्या बांधकामांचा राडारोडा अद्यापही जागेवरच पडून असून स्मार्ट शहराच्या विद्रुपीकरणात भर पडली आहे. शिवाय, पावळ्यामुळे पाणी साचून डबके तुंबल्याने डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. राडारोड्यातील मातीयुक्तपाणी महामार्गावर येऊन तो निसरडा झाला आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील कासारवाडी येथील नाशिक फाटा ते मोशी येथील इंद्रायणीनदीवरील पुलापर्यंत नाशिक महामार्गाची हद्द शहरात आहे. चौपदरी महामार्गाचे सहापदरीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, अद्याप त्याला मुहूर्त मिळालेला नाही. रुंदीकरणासाठी महापालिकेच्या क व ई क्षेत्रीय कार्यालयांसह अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयाने मे महिन्यात सलग सहा दिवस कारवाई केली.

भोसरीतील लांडेवाडी कॉर्नरपासून मोशीतील इंद्रायणी नदीवरील पुलापर्यंत बांधकामे पाडली. काही नागरिकांनी ती स्वतः काढून घेतली. मात्र, त्याचा राडारोडा अद्याप तसाच पडून आहे. काही नागरिकांना वापरासाठी अडचण होत असल्याने स्वतःच राडारोडा उचलून नेला आहे. जागेवर असलेल्या राडारोड्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजू बकाल दिसत आहेत.

सर्वाधिक बांधकामे मोशीची

मे महिन्यात पाडलेली सर्वाधिक बांधकामे मोशीतील आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूची बांधकामे पाडली आहेत. रस्ता रुंदीकरणात महापालिकेच्या शाळेची इमारत, पोलिस चौकी व दवाखान्याच्या इमारतीचा काही भागही जाणार आहे. कॉंक्रिट व विटांच्या बांधकामांसह काही पत्राशेड व जुनी कौलारू घरेही होती.

नागरिक म्हणतात...

  • आमची जागा गेलीय, आम्हाला अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे रस्त्याला आमचा विरोध आहे

  • यापूर्वीही रस्त्याचे रुंदीकरण झाले तेव्हाही आमची जागा गेली, त्याचाही मोबदला अद्याप मिळालेला नाही

  • उर्वरित जागेत आम्हाला बांधकाम करायचे आहे, त्यासाठी भराव टाकण्यासाठी राडारोडा वापरणार आहे

  • इंद्रायणी नदीपासून चाकणपर्यंतच्या बाधित जागा मालकांना ४० लाख रुपये गुंठ्याप्रमाणे मोबदला दिला आहे

  • महापालिकेने राडारोडा उचलून रस्ता सपाटीकरण करायला हवे, त्यामुळे नागरिकांना जाणे-येणे सोयीचे होईल

तांत्रिक अडचणी...

  • नाशिक फाटा ते मोशी इंद्रायणी नदीपर्यंत महामार्गाचा अधिकार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा आहे

  • महामार्गाच्या दोन्ही बाजूचे सेवा रस्ते प्रस्तावित आहेत, ते कोणी करायचे याबाबत निर्णय व्हायचा आहे

  • सध्या महामार्ग चौपदरी आहे, मध्ये दुभाजक व भोसरीत उड्डाणपूल असून ६१ मीटर रुंदीकरण आराखडा आहे

  • रुंदीकरणाचा खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करायचा की महापालिकेने करायचा याबाबत विचार सुरू आहे

  • जागेचा मोबदला दिल्याशिवाय राडारोडा उचलायचा नाही, रस्ता करू देणार नाही, अशी मालकांची भूमिका

महामार्गालगत आमचे दुकान होते. रस्ता रुंदीकरणात ते गेले. आम्ही स्वतः काढून टाकले. राडारोडाही स्वतः उचलून घेतला आहे. सर्विस रस्त्याचे काम लवकर व्हायला हवे.

- मधुकर आल्हाट, बाधित जागामालक, मोशी

महामार्गाची मालकी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. महामार्ग ६१ मीटर रुंदीकरणाचा आराखडा आहे. बाधित होणाऱ्यांना नोटीस देऊन कार्यवाही केली आहे.

- मकरंद निकम, शहर अभियंता

एलिव्हेटेड मार्ग कधी?

नाशिक फाटा- मोशी- चांडोली गावापर्यंत (राजगुरुनगर) नाशिक महामार्ग केंद्र सरकारतर्फे एलिव्हेटेड अर्थात उन्नत मार्ग केला जाणार आहे. त्यामुळे वीस मिनिटात प्रवास करता येईल व महामार्गावरील कोंडी सुटेल, असे महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी मार्च महिन्यात लोकप्रतिनिधींना सांगितले होते. त्यामुळे उड्डाणपूल कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

असा निघेल मार्ग

बाधित नागरिकांना मोबदला वेळेत मिळाल्यास त्यांचे नुकसान टळेल. जागेचा ताबा मिळून महामार्गाला सेवा रस्ता निर्माण होऊन सततच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना होईल. राडारोडामुक्त रस्ता होईल. महामार्गाचा सध्याचा भाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व सेवा रस्ते महापालिकेने विकसित केल्यास मार्ग निघेल.

अंदाजे पाडलेली बांधकामे

  • २८५ मोशी, भोसरीतील बांधकामे

  • १,८६,०७४ पाडलेले चौरस फूट क्षेत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT