demand from the stall holders to extend the night time of Pavanathadi Jatra pune sakal
पिंपरी-चिंचवड

पवनाथडी जत्रेचा रात्रीचा वेळ वाढविण्याची स्टॉल धारकांकडून होतेय मागणी

पिंपरी-चिंचवडसह उपनगर आणि पुण्यातून नागरिक मोठ्या संख्येने पवनाथडीत येत आहेत

रमेश मोरे

जुनी सांगवी : महापालिकेच्या वतीने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजित पवनाथडी जत्रेत नागरिकांनी पहिल्या दिवसांपासूनच मोठी गर्दी केली आहे. विशेषकरून खवैय्यानी अस्सल गावरान, खान्देशी, मांसाहारी, शाकाहारी पदार्थांवर ताव मारला. पिंपरी-चिंचवडसह उपनगर आणि पुण्यातून नागरिक मोठ्या संख्येने पवनाथडीत येत आहेत. शनिवार व रविवार आलेल्या सुट्टीमुळे दिवसभर चटचटत्या उन्हात व रात्री दहापर्यंत नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.मात्र नियमानुसार रात्री दहा वाजता बत्ती बंद होत असल्याने सहकुटुंब सहपरिवारासह आलेले खव्वये व स्टॉल धारकांचीही तारांबळ उडत आहे.

स्टॉलमधे झालेली गर्दी फेरफटका,वस्तु खरेदी करून नागरिक मग खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी वळतात.मात्र अर्धे एक जेवण व वेळेचे बंधन यामुळे नागरिक व स्टॉल धारकांचीही परवड होते.हातातील ग्राहकही सोडता येत नाही.यानंतर अंधारातच आवरावर करत स्टॉल धारकांना घर गाठावे लागत असल्याने परवड होत असल्याने एक तास वाढवून मिळावा अशी स्टॉल धारक व नागरिकांमधून मागणी होत आहे.

रात्री दहावाजता लाईट बंद होत असल्याने अनेकदा ग्राहकांना अंधारातच जेवण करावे लागते.त्यानंतर स्टॉल,भांडी आवरा आवर करणे या गोष्टींना वेळ लागतो.किमान दहा नंतर एक तास वाढवून द्यावा.

- स्वाती वाघवळे - स्टॉल धारक

अनेक स्टॉल्स मध्ये अंधुक प्रकाश आहे.पहिल्या दिवसांपासून अशा ट्युबलाईट बदलण्याची आमची मागणी आहे.

- मिनाक्षी शेट्टीवार स्टॉल धारक

महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाने नागरिक व स्टॉल धारकांची अडचण लक्षात घेऊन एक तास वेळ वाढवून द्यावा त्यामुळे नागरिकांचीही तारांबळ होणार नाही.

- प्रशांत शितोळे माजी नगरसेवक जुनी सांगवी.

महापालिकेच्या व्यवस्था विभागाकडून टप्प्यात टप्प्याने लाईट बंद करण्यात येतात.स्टॉल धारक व नागरिकांची अडचण होवू नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दहानंतर परिस्थिती अनूरूप खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर अर्धा तास वाढवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

- सुहास बहाद्दरपुरे समाज विकास अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT