Dengue sakal
पिंपरी-चिंचवड

Dengue : ‘डेंगी’चा वाढतोय ‘ताप’; मलेरियाच्या रुग्णांतही वाढ; खासगी व सरकारी रुग्णालयात गर्दी

गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाने जोर पकडला आहे. वाढलेल्या पावसामुळे शहरात डेंगी, मलेरियाच्या संशयित रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

- अश्‍विनी पवार

पिंपरी - गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाने जोर पकडला आहे. वाढलेल्या पावसामुळे शहरात डेंगी, मलेरियाच्या संशयित रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जूनच्या अखेरपर्यंत शहरात तीन डेंगीच्या रुग्णांची नोंद झाली होती. केवळ १६ दिवसांत ही संख्या वाढून १७ पर्यंत पोचली आहे तर संशयित रुग्णांची संख्याही वाढत आहे. डेंगीचा वाढता प्रादुर्भाव पाहता, नागरिकांनी अधिक दक्षता घेणे आवश्‍यक असल्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

सर्दी, खोकल्याचे रुग्णही वाढले

एका बाजूला शहरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे सर्दी, खोकला व तापाचे रुग्णही वाढत आहेत. बदललेल्या हवामानामुळे विषाणूजन्य आजार पसरत आहेत. त्यामुळे शहरातील खासगी व सरकारी दवाखान्यांमध्ये सर्दी व तापाच्या रुग्णांची गर्दी होत आहे. या रुग्णांमध्ये डेंगी सदृश लक्षणे आढळून आल्यास त्यांनाही डेंगीची तपासणी करण्यास सांगितले जात आहे.

आकडे बोलतात...

डेंगीचे रुग्ण -

  • ३० जूनपर्यंत - ३

  • १६ जुलैपर्यंत - १७

  • १ जूनपासून आढळलेले संशयित रुग्ण - २,७७५

मलेरियाचे संशयित रुग्ण -

  • जून - १८ हजार ४६६

  • १६ जुलैपर्यंत - २६,९९२

मलेरिया झालेले रुग्ण -

  • जून - २

  • १६ जुलैपर्यंत -६

(१ जूनपासूनची आकडेवारी)

डेंगीची लक्षणे

  • तीव्र ताप, डोकेदुखी व सांधेदुखी

  • उलट्या होणे, डोळ्यांच्या आतील भागात दुखणे

  • अंगावर पुरळ उठणे

  • घशाला कोरड पडणे

  • अशक्तपणा जाणवणे

  • भूक मंदावणे

  • नाकातून रक्तस्राव होणे

  • पोट दुखणे, उलट्या होणे

याकडे लक्ष द्या

  • संसर्गग्रस्त एडिस इजिप्ती डास चावल्याने डेंगीची लागण होते.

  • या डासाची उत्पत्ती घरातील भांड्यात व आजूबाजूला साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते.

  • संक्रमित डास एकदाच चावल्याने डेंगी होऊ शकतो.

  • डेंगीचा डास दिवसा चावतो.

  • डेंगीची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्व तपासण्या करून घ्याव्यात

प्रतिबंधात्मक उपाय काय

  • घरातील पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून कोरडी करावीत

  • पाण्याचा साठा असणाऱ्या टाक्यांची झाकणे घट्ट बसवावी

  • डासांची पैदास होऊ नये यासाठी घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा

  • कुंड्या, फुलदाणी, फ्रिजचा ट्रे यातील पाणी वारंवार साफ करावे

  • घराच्या खिडक्यांना मॉस्किटो नेट बसवून घ्याव्यात

  • मच्छरदाणीचा वापर करावा

  • लहान मुलांच्या कपड्यांवर मॉस्किटो रिपेलंट लावावे

  • घराबाहेर पडताना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत

  • ताज्या व गरम अन्नाचे सेवन करावे

  • अन्नपदार्थ झाकून ठेवावेत

  • नियमित व्यायाम करावा

  • वापरात नसलेली तुटकी भांडी, ड्रम, टायर यांची विल्हेवाट लावावी

डेंगीमुक्त मोहीम

कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने डेंगीमुक्त पिंपरी चिंचवड ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. वैद्यकीय विभागाच्यावतीने या मोहिमेची नुकतीच सुरवात करण्यात आली. या मोहिमेंर्तगत संपूर्ण आठवडाभर विविध क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांची तपासणी करणे, शाळांमध्ये डेंगी विषयी जागरुकतेचे व्हिडिओ व ऑडिओ क्लिप ऐकविणे, पोस्टर स्पर्धा, रॅली, व्याख्याने आदी उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे.

मोहिमेतील मुद्दे

  • आंतरविभागीय समन्वय समितीची स्थापना

  • शाळा, महापालिका कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी डिजिटल फलक व सोशल मिडीयाद्वारे मोहिमेचे आयोजन

  • हाउसिंग सोसायट्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून डेंगी मुक्त रहिवासी सोसायट्यांना प्रमाणपत्र

  • आशा वर्कर्स व आयईसी टीम झोपडपट्ट्यांवर लक्ष केंद्रित करतील

  • रुग्णांच्या ट्रॅकींगकरिचा डिजिटल डॅशबोर्ड तयार करण्यात येतील.

  • रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, बसस्थानके येथे जनजागृतीपण संदेश प्रसारित केले जातील

‘डेंगी आजाराला रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी ‘बीट डेंगी’ ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे. डेंगीला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.

- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य वैद्यकीय विभागाची कार्यवाही

शहरात डेंगीचा प्रादुर्भाव पाहता महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाच्यावतीने ठिकठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. १ जूनपासून आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीमध्ये शहरातील ७२ हजारांहून अधिक घरांची तपासणी करण्यात आली आहे. तर डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या २४२ आस्थापनांवर कारवाई करून ८ लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे.

  • तपासलेल्या घरांची संख्या - ७२ हजार ७६७

  • डास अळ्या आढळलेली घरे - १७०१

  • सापडलेली कंटेनर संख्या - ३ लाख २७ हजार ४२०

  • डास अळ्या आढळलेली कंटेनर संख्या - १९००

  • तपासलेली बांधकाम

  • आस्थापना ३४८

  • तपासणी केलेली भंगार व टायरची दुकाने - २६५

  • बजावण्यात आलेल्या एकूण नोटिसा - ६०२

  • दंडात्मक कारवाई केलेली आस्थापने, व्यक्ती - २४२

  • एकूण दंडाची वसुली - ८ लाख १५ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT