भोसरी - भोसरीतील अर्बन सिटी अंतर्गत पुणे-नाशिक महामार्गाच्या (Pune Nashik Highway) सेवा रस्त्यालगतच्या (Service Road) पदपथावर गटाराच्या पाइपलाइन (Drainage Pipe Line) टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू असल्याने पदपथ खोदून ठेवला आहे. अनलॅाकडाऊननंतर दुकाने (Shop) सुरू करण्याची परवानगी महापलिकेद्वारे (Municipal) देण्यात आली आहे. मात्र दुकानांसमोरील पदपथ खोदून ठेवण्यात आल्याने दुकान सुरू ठेवण्यात अडचणी येत असल्याची कैफीयत एक दुकानदार मांडत होते. (Difficulties in Maintaining Shop Digging of Sidewalks in front of Shops in Bhosari)
पिंपरी-चिंचवड महपलिकेच्या बीआरटीएस विभागाद्वारे भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली आणि सेवा रस्त्यावरलगत अर्बन सिटी विकसीत करण्यात येत आहे. या कामाअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा साडेचार मीटर रुंदीचे पदपथ विकसीत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पदपथ करण्यापूर्वी याठिकाणी गटार आणि स्ट्रॅाम वाटर लाइनसाठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम गेल्या एक वर्षापासून संथगतीने सुरू आहे.
या कामाअंतर्गत भोसरीतील खंडोबामाळ ते संत ज्ञानेश्वर मंगल कार्यालयपर्यंतचा पदपथ खोदून ठेवला आहे. काही भागातील पदपथ पेव्हिंग ब्लॅाक लावून पूर्ण करण्यात आला आहे. मात्र उड्डाणपुलाखालील खंडोबामाळ ते भोसरी-आळंदी रस्ता चौक, जुने संत ज्ञानेश्वर रुग्णालय ते पीएमटी चौक आदी भागातील पदपथ खोदून ठेवले आहेत. या भागातील पदपथाच्या विकसनाची कामे सुरू आहेत.
सामाजिक कार्यकर्ते जलिंदर शिंदे यांनी सांगितले, की अनलॅाकडाऊननंतर दुकाने सुरू झाली. मात्र खोदण्यात आलेल्या पदपथांमुळे ग्राहक दुकानात खरेदीसाठी येत नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे अवघड झाले आहे. महापालिकेने पदपथाचे काम तातडीने पूर्ण केले पाहिजे.
लॅाकडऊनमुळे दुकाने बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आता दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र, दुकानासमोरील पदपथ खोदले आहेत. पाइपलाइन टकण्यासाठी खड्डेही खोदले आहेत. त्यामुळे दुकान उघडण्यासही अडचण होत आहे.
- एक व्यापारी, भोसरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.