Pimpri: वाहन चालविण्याचा परवाना हरवला असल्यास दुबार वाहन परवाना घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आता हा वाहन परवाना हवा असल्यास नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. ६५८ रुपयांनी हा परवाना घ्यावा लागणार आहे. यंदाच्या वर्षी पिंपरी -चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सहा हजार ८९९ दुबार वाहन परवान्याचे वाटप केले आहे.
अनेक कारणांमुळे नागरिकांवर दुबार वाहन परवाना काढण्याची वेळ येत आहे.
वाहनचालक परवाना हरवला, तुटला, खराब झाला, फोटो दिसेनासा झाला अशा विविध कारणांस्तव दुबार वाहन परवाना काढतात. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात अशी संख्या वाढत आहे. मागील वर्षी २०२३ मध्ये ११ हजार ५२७ दुबार वाहन परवाना वाटप करण्यात आला आहे.
तर यंदाच्या वर्षी २०२४ मध्ये ६ हजार ८९९ वाहन परवाना वाटप झाला आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार राज्य परिवहन विभागाने दुबार वाहन परवान्याचे शुल्क ४०० रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना आता दुबार वाहन परवान्यासाठी ६५८ रुपये मोजावे लागणार आहेत.
२०२१ च्या अधिसूचनेनुसार दुबार वाहन परवाना शुल्क वाढविण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी ऑगस्टपासून या निर्णयाची राज्यातील सर्व परिवहन कार्यालयात अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. एक ऑगस्टपर्यंत २५८ रुपये शुल्क आकारले जात होते.
मात्र, आता नागरिकांना दुबार लायसन्ससाठी ४०० रुपये जादा म्हणजेच ६५८ रुपये मोजावे लागणार आहेत. परिवहन विभागाच्या निर्णयानुसार पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने कार्यवाही सुरू केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुबार वाहन परवाना हवा असल्यास त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार ही वाढ करण्यात आली आहे. आरटीओच्या वतीने यंदाच्या वर्षी ६ हजार ८९९ लायसन्सचे वाटप करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.