Sun Environment Sakal
पिंपरी-चिंचवड

२२ डिग्री हॅलो, मॅमॅटस, स्टारटो; तुम्हाला माहितीये का ढगांच्या छबी?

लॉकडाउन सुरू झाला आणि वातावरणात भरमसाट बदल घडून आले. निसर्गातील चक्र बदलले. ढगांमध्येही विविध छटा दिसल्या. विविध रंगांचे आच्छादन आले.

प्रशांत पाटील

पिंपरी - लॉकडाउन (Lockdown) सुरू झाला आणि वातावरणात (Environment) भरमसाट बदल घडून आले. निसर्गातील चक्र बदलले. ढगांमध्येही विविध छटा (Shades of Clouds) दिसल्या. विविध रंगांचे आच्छादन आले. फुलांचे गुच्छ व सोनेरी लहरींप्रमाणे विविध स्वरुपातील पांघरून ढगांनी घेतले. पर्यावरणातील हे बदल पर्यावरण विभागामध्ये शिकणाऱ्या व निसर्गाची (Nature) आवड असणाऱ्या शहरातील एका २२ वर्षीय युवकाने यावर्षीच्या मार्च व एप्रिल महिन्यांत कुतूहलापोटी टिपले आहेत. (Due to the Change in the Weather Different Shades of Clouds were Seen)

काळेवाडी विजयनगर मधील सुयश व्हिक्टर गोरे या तरुणाने ढगांच्या विविध छटा कॅमेऱ्याव्दारे टिपल्या आहेत. मेट्रोलॉजीमधून नेफोलॉजीचा अभ्यास करून गुगलच्या साहाय्याने त्याने हे निरीक्षण नोंदवले आहे. त्याचबरोबर ‘क्लाऊड फॉर अ डे’ या ॲपची त्याने अभ्यासासाठी मदत घेतली. ज्या प्रकारे पक्ष्यांचे स्थलांतर होते. त्याच प्रकारे पक्षी पावसाचा व वातावरणातील बदलाचा अंदाज घेऊन स्थलांतर करतात. सर्वांचे नाते एकमेकांशी जोडले आहे. ही निसर्गाची साखळी अद्भुत असल्याचे सुयशने अनुभवले आहे.

‘क्युमलस’, ‘२२ डिग्री हॅलो’, ‘मॅमॅटस’, ‘अनड्युलाटस’, ‘लॅक्युनसस’, ‘अल्टोक्युमलस’, ‘स्टारटो क्युमलस’, ऑल इन वन या ढगांच्या छबीसह रेनबो, सन व विजांचे फोटो त्याने टिपले आहेत. यातील ‘२२ डिग्री हॅलो’ हा प्रकृतीने बनविलेला अद्भुत बाब आहे. ‘मॅमॅटस’ याला मामाही संबोधले जाते. ‘स्टारटो’ हा दोन किलोमीटरवर नजरेस पडला आहे. ‘लॅक्युनसस’ हा देखील दुर्मिळ आहे. तो दूध फाटल्यासारखा नजरेस पडतो. हवेचे प्रमाण हे ३० डिग्री असल्यानंतर हे दुर्मिळ ढग नजरेस पडत आहेत. याचे सर्वाधिक लेअर हे थंड भागात आढळून येतात. काही ढग हे आठ ते नऊ किलोमीटर दूर असतात. या सर्वांच्या हालचाली टिपल्यानंतर मी प्रतिकृती शोधल्या. किती किलोमीटरवर हे ढग नजरेस पडतात तसेच, या बदलांमुळे हवामानाचा अंदाज घेणे सोपे होते. याचा अभ्यास केला.

- सुयश गोरे, विद्यार्थी, काळेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 नोव्हेंबर 2024

आजचे राशिभविष्य - 25 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT