E-Bike Speed Sakal
पिंपरी-चिंचवड

E-Bike Speed : ई-बाईक ओलांडताहेत वेगमर्यादा

मोटार वाहन कायद्यानुसार नोंदणीपासून सूट असणारी व ताशी २५ किलोमीटरपर्यंत वेगमर्यादा असलेली ई-वाहने सुसाट पळवली जात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मोटार वाहन कायद्यानुसार नोंदणीपासून सूट असणारी व ताशी २५ किलोमीटरपर्यंत वेगमर्यादा असलेली ई-वाहने सुसाट पळवली जात आहेत.

पिंपरी - मोटार वाहन कायद्यानुसार नोंदणीपासून सूट असणारी व ताशी २५ किलोमीटरपर्यंत वेगमर्यादा असलेली ई-वाहने सुसाट पळवली जात आहेत. अनेकदा अल्पवयीन मुले वाहन चालविताना दिसत आहेत. असे वाहन चालविण्यासाठी वाहन चालविण्याच्या परवान्याचीही गरज नाही. मात्र, वेगमर्यादेचे उल्लंघन केले जात असून, अपघात अथवा गुन्हेगारी कृत्य घडल्यास वाहन पकडायचे व शोधायचे कसे? असा प्रश्न सजग नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

असे आहे धोरण

पर्यावरण पूरक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२१ लागू केले आहे. ई-बाईक्स व ई-वाहनांना मोटार वाहन करातून धोरण कालावधीसाठी शंभर टक्के सूट दिलेली आहे.

सूट असलेली वाहने

केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार २५० वॅटपेक्षा कमी क्षमतेची बॅटरी असलेली व ताशी २५ किलोमीटरपेक्षा कमी वेगमर्यादा असलेल्या ई-बाईक्सला नोंदणीपासून सूट आहे. त्यामुळे अशा वाहनांना क्रमांक नसतो.

परिवहन विभागाचे निरीक्षण

ई-वाहनांची बॅटरी क्षमता २५० वॅटपेक्षा व ताशी वेगमर्यादा २५ किलोमीटरपेक्षा जास्त केली जात असल्याचे निदर्शनास आले असल्याचे परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना मे महिन्यात कळविले आहे.

काय होऊ शकते?

वाहनांची बॅटरी क्षमता व वेगमर्यादेत बेकायदा बदल केल्यास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ई-बाईक्सना आग लागून अपघात झाल्याच्या घटना घडत आहेत.

नागरिकांनी काय करावे?

प्राधिकृत संस्थेने मान्यता दिलेल्या मानकांप्रमाणे वाहन असल्याची आणि संबंधित वाहन वितरक व उत्पादकांकडे मान्यताप्राप्त संस्थेचा व परिवहन आयुक्तांची परवानगी असल्याची खात्री करावी.

वाहनांबाबत सूचना

वाहन उत्पादक, वितरक व नागरिकांनी वाहनांमध्ये अनधिकृत बदल करू नयेत. केलेले बदल त्वरित पूर्ववत करावेत. असे बदल आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार परिवहन अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करावेत.

आपोआप होतो बदल?

बॅटरीवर चालणारी वाहने काही महिने निर्धारित वेगमर्यादेनुसार धावतात. मात्र, त्याचा डिस्प्ले किंवा वायरिंग खराब झाल्यास आपोआप वेगमर्यादा वाढते. स्पिडोमीटरमध्ये हा डिस्प्ले असतो, असे एका शोरुममधील वीजेची कामे पाहणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले.

मी बॅटरीवर चालणारी दुचाकी घेतली आहे. तिला आरटीओकडे नोंदणीची गरज नाही. काही दिवस गाडी ताशी २५ किलोमीटर वेगाने चालत होती. पण, दोन-तीन महिन्यांनी ती आपोआप २५ पेक्षा अधिक वेगाने धावू लागली आहे. हा प्रकार वाहन विक्रेत्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.

- दीपक, वाहनचालक

बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांच्या बॅटरीची क्षमता २५० वॅट्स दर्शवली आहे. परंतु, आमच्याकडील वाहनांच्या बॅटरीची क्षमता ८०० वॅट्सपेक्षा जास्त असल्याचा आमचा संशय आहे. आम्ही अंतर्गत चाचणी घेतली तेव्हा प्रतितास ३५ किलोमीटर वेग नोंदविला आहे. त्याबाबत तक्रार केली आहे.

- योगेश सेठिया, वाहन विक्रेते, चिंचवड

ताशी २५ किलोमीटर वेग मर्यादा असलेली वाहने मोटार वाहन कायद्यात बसत नाहीत. त्यामुळे त्यांची नोंदणी करता येत नाही. मात्र, अशा वाहनांचा वेग जास्त असल्यास त्यात छेडछाड केलेली असणार. अशा वाहन चालकांसह त्यात छेडछाड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील.

- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT