पिंपरी-चिंचवड

महावितरण करतंय तरी काय? भोसरी परिसरात तीन दिवसांपासून वीज गायब 

संजय बेंडे

भोसरी :  येथील पीएमटी चौक, भोसरी गावठाणातील काही भाग, दिघी रस्त्यावरील आदर्शनगर आदी भागातील बुधवारी (ता. ५) सकाळी खंडित झालेला पुरवठा गुरुवारी (ता. ६) संध्याकाळी साडेसात वाजता सुरळीत झाला. मात्र, पीएमटी चौकातील विद्युत पुरवठा गुरुवारी (ता. ६) मध्यरात्रीपासून पुन्हा खंडित होऊन शुक्रवारी (ता. ७) दुपारपर्यंतही सुरळीत झालेला नव्हता. त्यामुळे दुकानदार, नागरिकांना नाहक त्रास झाला.  भोसरी परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

मंगळवारपासून (ता. ४) भोसरी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी भोसरीतील पीएमटी चौक, भोसरी गावठाण, दिघी रस्त्यावरील आदर्शनगर आदी भागातील वीजपुरवठा खंडित झाला. गुरुवारी पीएमटी चौक, गावठाण परिसरातील विद्युत पुरवठा संध्याकाळी साडेसात वाजता सुरळीत झाला. मात्र, पीएमटी चौकातील विद्युत पुरवठा शुक्रवारी दुपारपर्यंतही सुरळीत झालेला नव्हता. बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवस, तर पीएमटी चौक परिसरातील सलग तीन दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याने बेकरी, हॅाटेल चालकांना दूग्धजन्य पदार्थ शीतगृहात साठविण्यासाठी अडचण निर्माण झाली. काही बेकरी चालकांनी विद्युत जनरेटर आणून शीतगृह सुरू ठेवले. कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या भितीने नागरिक घरी राहणे पसंत करतात. या वेळी  दूरदर्शनवरील विविध कार्यक्रम पाहून वेळ घालवतात.  मात्र वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्याचप्रमाणे मोबाईलही रिचार्ज न झाल्याने मोबईल प्रेमींची निराशा झाली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या विषयी महावितरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की पावसाळ्यात केबल आणि विद्युत जनित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढते. त्याचप्रमाणे गटार व पाण्याची लाईन आदी कामासाठी झालेल्या खोदकामामुळे केबलला आघात होतो.  पावसाचे पाणी अशा केबलमध्ये गेल्यास त्या नादुरुस्त होतात. बुधवारी भोसरी-आळंदी रस्त्यावरील विद्युत जनित्र आणि केबलमध्ये बिघाड झाला. त्याचप्रमाणे दिघी रस्त्यावरीलही केबलमध्ये बिघाड झाला.  त्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम पावसातही सुरू आहे. महावितरणचे कर्मचारी पावसात भिजत असतानाही विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करत आहेत. भोसरीतील दिघी रस्त्यावरील केबल दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत  सुरू आहे.

पाणीही गेले वाया...

पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे दिवसा आड पाणीपुरवठा केला जातो.  काही भागात नळाचे पाणी वरच्या मजल्यावर चढत नाही. त्यामुळे पाण्याची मोटार लावून गृहिणी पाणी भरतात. शुक्रवारी पीएमटी चौक परिसर भागातील पाण्याचा दिवस होता. मात्र वीज पुरवठा खंडित झाल्याने गृहिणींना पाणी भरता आले नाही. सलग दोन दिवस पाणी नसल्याने गृहिणींनी संताप व्यक्त केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : सातारा महामार्गावरील खांबटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT