पिंपरी-चिंचवड

महापालिका अग्निशमन दलाची आपत्कालीन पथक हेल्पलाइन

CD

पिंपरी, ता. १९ ः वादळ, मान्सूनपूर्व पाऊस आणि आगामी काळातील पावसाळा या पार्श्वभूमीवर महापालिका अग्निशमन दलाने आपत्कालीन हेल्पलाइन जाहीर केली आहे. संभाव्या आपत्ती निवारणासाठी अग्निशमन दलही सज्ज झाले आहे.
शहर परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. गेल्या आठवड्यात काही भागात तीन-चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. वादळही असते. त्यामुळे झाडे व होर्डिंग पडल्याच्या घटना घडल्या आहेत. गुरुवारी (ता. १६) एकाच दिवशी केवळ एक ते दीड तास झालेल्या वादळी पावसात एक होर्डिंग आणि १६ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्याकडून मदतकार्यही सुरू झाले होते. पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत आहे. अधिक पाऊस झाल्यास नदीकाठच्या व शहरातील सखल भागात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होते. तिथे दरवर्षी मदतकार्य पोहोचावे लागते. त्यासाठी अग्निशामन दल नेहमीच सतर्क असते. त्यांनी नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. महापालिका अग्निशामक दलाचा नियंत्रण कक्ष आहे. शहराच्या विविध भागात उपकेंद्रही आहेत. शिवाय, प्रत्येक उपकेंद्र स्तरावर स्वतंत्र पथक स्थापन केले असून, त्यांची स्वतंत्र हेल्पलाइन जाहीर केली आहे.

अग्निशमन केंद्रासह पथक व हेल्पलाइन
अग्निशमन केंद्र / पथक हेल्पलाइन / केंद्र हेल्पलाइन
मुख्य केंद्र पिंपरी / ८४८४०८११०१, ८४८४०८२१०१ / ०२०-२७४२३३३३, ०२०-२७४२२४०५
मुख्य केंद्र नियंत्रण कक्ष / ७०३०९०८९९१ / ९९२२५०१४७५
भोसरी / ७०३०९०८९९२ / ९९२२५०१४७६, ८६६९६९२१०१
प्राधिकरण / ७०३०९०८९९३ / ९९२२५०१४७७, ०२०-२७६५२०६६
चिखली / ७०३०९०८९९५ / ८६६९६९४१०१, ०२०-२७४९४८४९
थेरगाव / ८९५६०३९२४५ / ७०३०९०७९९९, ७७६८०९०१०१
रहाटणी / ७०३०९०८९९४ / ९९२२५०१४७८, ८६६९६९३१०१
मोशी / ८६००६९४१०१ / ७२६४९४३३३३, ७३८७७७८१०१
तळवडे / ७०३०९०८९९६ / ९५५२५२३१०१, ०२०-२७६९०१०१
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT