Environment lovers sakal
पिंपरी-चिंचवड

Save Water Save Nature : पर्यावरणप्रेमींचा मोटारीने २० देशांचा प्रवास; ७० दिवसांत केले १९ हजार किलोमीटरचे अंतर पार

पर्यावरणाचे रक्षण आणि जतन करण्याचा संदेश देत ‘सेव्ह वॉटर... सेव्ह नेचर’ हे ब्रीद घेऊन मोशीतील पर्यावरणप्रेमी मदन भंडारी यांनी कोल्हापूरच्या चार मित्रांसह मोटारीने २० देशांचा प्रवास केला.

सकाळ वृत्तसेवा

मोशी - पर्यावरणाचे रक्षण आणि जतन करण्याचा संदेश देत ‘सेव्ह वॉटर... सेव्ह नेचर’ हे ब्रीद घेऊन मोशीतील पर्यावरणप्रेमी मदन भंडारी यांनी कोल्हापूरच्या चार मित्रांसह मोटारीने २० देशांचा प्रवास केला. मोशीपासून लंडनपर्यंतच्या प्रवासात त्यांनी ७० दिवसांत १९ हजार किलोमीटर इतके अंतर पार केले.

भंडारी यांच्यासमवेत त्यांचे मित्र हेमंत शहा, प्रताप कोंडेकर आणि सुधीर बोरा यांनी मोटारीने लंडनपर्यंत प्रवास केला. या प्रवासात परदेशातील कचऱ्याचे नियोजन, पाण्याचा योग्य वापर, पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती घेत प्रवासात भेट दिलेल्या २० देशांतील नागरिकांमध्ये पर्यावरण वाचवण्याबाबत जागृती केली.

भटकंतीतील अनुभव सांगताना भंडारी म्हणाले, ‘१५ एप्रिल ते २२ जून या कालावधीत मोशी, कोल्हापूर येथून लंडनपर्यंत हा प्रवास आम्ही मोटारीमधून केला. प्रवासाला निघण्यापूर्वी सहा महिन्यांपासून मार्गातील विविध देशांचे वाहतुकीचे नियम, प्रासंगिक वाहन परवाने, विमा याची पूर्वतयारी केली.

भाषिक अडचण येऊ नये यासाठी दुभाषकाचीही मदत घेण्यात आली. विविध गोष्टींची पूर्वतयारी केल्यामुळे प्रवासात कोणतीही अडचण आली नाही. मोशी, कोल्हापूर ते लंडन हा प्रवास करत असताना मार्ग निश्चित करणे हे मोठे आव्हान होते.’

भंडारी आणि त्यांच्या मित्रांनी नेपाळ, तुर्कस्तान, रशिया, बल्गेरिया, सर्बिया, हंगेरी, बेल्जियममार्गे लंडन गाठले. या प्रवासात जिथे पाण्याची टंचाई आहे; त्या शहरांमधील पुरातन तंत्रप्रणालीच्या माध्यमातून पाण्याची मुबलकता वाढवली जात असल्याचे त्यांना दिसून आले. या प्रवासात परदेशातील शेतीतंत्राचा अभ्यास त्यांना जवळून करता आला. पाण्याचा वापर आणि नियोजन, कचऱ्याचे वर्गीकरण, वाहतुकीचे नियम, ध्वनी प्रदूषणाबाबत जागरूकता याविषयी त्यांना चांगले अनुभव आले.

विदेशातील प्रवासाअंतर्गत भेट दिलेल्या देशांतील स्थानिक लोकांशी संवाद साधताना पर्यावरणाशी ते कशा रीतीने जोडले आहेत हे आम्हाला जाणून घेता आले. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून जगभरात पर्यावरण संवर्धन कसे केले जाते? हे देखील समजले.

- मोहन भंडारी, पर्यावरणप्रेमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT